________________
त्यापासून आत्म्याच्या उच्चवृत्तीचे हनन (मरण) होतं. अहिंसा धर्माच्या उपासकाकरिता स्वतःचा स्वार्थ- स्वतः या लोभानिमित्ताने स्थूल हिंसेचा परियाग करणे, पूर्ण आवश्यक आहे. जो मनुष्य आपल्या विषय तृष्णेची पूर्ति करण्याकरितां स्थूल प्राण्यांना दुःख देतो, तो केव्हाही कोणत्याहि प्रकारें अहिंसाधर्मी ह्मणविला जात नाहीं. अहिंसक गृहस्थाकरितां जर हिंसा करणें योग्य असेल, तर फक्त तें दुसऱ्याकरितांच आहे. या सिद्धांतापासून विचार करणारी मनुष्यें समजू शकतात कीं, अहिंसाव्रताचे पालन करीत असतांही, गृहस्थ आपल्या समाज आणि देशाचे रक्षण करण्याकरितां युद्ध करूं शकतो. ह्या विषयाच्या सत्यतेकरितां आह्मी येथे ऐतिहासिक प्रमाणही देत आहोंत.
गुजराथचा अंतिम चौलुक्य नृपति दूसरा भीम ( ज्यास भोळा भीम देखील ह्मणतात ) यांच्याकाळी, एकेवेळीं त्याच्या अणहिलपुर नांवाच्या राजधानींवर मुसलमानांचा हमला झाला. त्यावेळीं राजधानीत - राजा हजर नव्हता. फक्त राणी हजर होती. मुसलमानाच्या हमल्यापासून शहराचे संरक्षण कसे करावे ? याविषयी सर्व अधिकाऱ्यांना फारच चिता झाली. दंडनायका ( सेनापती ) च्या पदावर त्यासमयीं एक आभू नांवाचा श्रीमाली वणिक श्रावक होता. तो आपल्या अधिकारावर नवीनच आलेला होता आणि तो विशेष धर्माचरण करणारा पुरुष होता. याकरितां त्याच्या युद्धविषयक सामर्थ्याविपयीं कोणालाही निश्चित विश्वास नव्हता. इकडे एक तर राजा गैरहाजर होता, दुसरें, - राज्यांत कोणीच तसा पराक्रमी पुरुष दुसरा नव्हता, आणि तिसरें कारण, राज्यांत यथेष्ट सेन्यही नव्हते. यामुळे राणीला फारच चिंता
* संसारांत राहून स्कूल नियमाप्रमाणे वागणाऱ्या गृहस्थास जैन धर्मामध्ये श्रावक असें ह्मणतात.