________________
आणि अहिंसा पालन करण्याकरिता आत्मघाताचीही आवश्यकता नाही. हा विचार तर त्याच प्रमाणे आहे. ज्याप्रमाणे महात्मा गांधी यांनी देशाच्या उध्दाराकरितां जेव्हां असहयोगाची योजना उद्घोषित केली होती, तेव्हां अनेक विद्वान आणि नेता ह्मणविणाऱ्या मनुष्यांनी त्यांच्या ह्या योजनेस अव्यवहार्य आणि राष्ट्रनाशक दाखविण्याविषयी मोठ मोठाल्या गोष्टी केल्या होत्या आणि जनतेस त्यांच्यापासून सावध राहण्याविषयी सूचना केल्या होत्या; परंतु अनुभव आणि आचरणावरून आतां हे निःसंदेह सिध्द झाले की असहयोगाची योजना अव्यवहार्यही नाही व राष्ट्राचा नाश करणारीही नाही. हां, जो आपल्या स्वार्थाचा भोग देण्याकरितां तयार नाही आणि आपल्या सुखांचा परित्याग करण्यास तत्पर नाही, त्यांच्या करितां ह्या दोन्ही गोष्टी अवश्य अव्यवहार्य आहेत, यामध्ये कांहींच संशय नाही. स्वार्थत्याग आणि सुखाकडे दुर्लक्ष केल्याशिवाय आत्म्याचा किंवा राष्ट्राचा उध्दार केव्हाही होत नाही. राष्ट्राला स्वतंत्र आणि सुखी बनविण्याकरितां ज्याप्रमाणे सर्वस्व अर्पण करण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे आत्म्याला आधि ह्मणजे मानसिक दुःख, व्याधि अर्थात् शारीरिक दुःख, आणि उपाधिपासून स्वतंत्र होण्याकरिता तसेंच दुःख द्वंद्वापासून मुक्त बनविण्याकरिता सुध्दां, सर्व क्षणभंगुर सुखांचे बलिदान करून देण्याची आवश्यकता आहे. ह्याकरितां जो मुमुक्षु ह्मणजे बंधनापासून मुक्त होण्याची इच्छा ठेविणारा आहे, राष्ट्र आणि आत्म्याच्या उध्दाराविषयी इच्छा करणारा आहे, त्याला तर ही जैन अहिंसा अव्यवहार्य आणि आत्मनाशक आहे असें केव्हाही माहीत होणार नाही. परंतु स्वार्थामध्ये लुब्ध बनलेले आणि सुखाची इच्छा करणाऱ्या जीवांची गोष्ट वेगळी आहे.
जैन धर्माच्या अहिंसेवर दुसरा परंतु मोठा आक्षेप हा केला जातो की ह्या अहिंसेच्या प्रचाराने भारतवर्षास परतंत्र बनविले आणि प्रजेस