________________
। वर सांगितलेली भ्रांति बिंबून जाणे साहजिक आहे. याकरितां आलीं • येथे संक्षिप्त रीतीने आज जैनधर्माच्या अहिंसेविषयी ज्या वर सांगितलेल्या
भ्रांतिमूलक कल्पना जनसमाजांत पसरल्या आहेत, त्यांचा खोटेपणा दाखवितो.
जैनधर्माच्या अहिंसेविषयी पहिला आक्षेप हा केला जातो की, जैन धर्माच्या प्रवर्तकांनी अहिंसेची मर्यादा इतकी लांब आणि इतकी विस्तृत बनविली आहे की त्यामुळे सरासरी अव्यवहार्याच्या कोटीत ता जाऊन पोहोचली आहे. जो कोणी या अहिंसेचें पूर्णरूपाने पालन करण्यास इच्छील, त्यास आपल्या सर्व जीवनक्रिया बंद कराव्या लागतील आणि निश्चेष्ट होऊन शरीराचा त्याग करावा लागेल. जीवनव्यवहारास चालू ठेवणे आणि ह्या अहिंसेचे पालन करणे, ह्या दोन्ही गोष्टी परस्पर विरुद्ध आहेत, ह्मणून ह्या अहिंसेचे पालन करण्याचे तात्पर्य आत्मघात करणे आहे, वगैरे.
जैन अहिंसेची मर्यादा फारच विस्तृत आहे, ह्मणूनच पालन करणे सर्वाकरितां फारच कठीण आहे, यांत कांही संशय नाहा; तथापि ही सर्वथा अव्यवहार्य आहे किंवा आत्मघातक आहे, या सांगण्यांत कांहींच तथ्यांश नाही. ही अहिंसा अव्यवहार्यही नाही; आणि
आत्मघातक देखील नाही. ही गोष्ट तर सर्व लोक स्वीकारितात आणि मान्य करितात की, ह्या अहिंसा तत्त्वाच्या प्रवर्तकांनी आहिंसेचे आचरण आपल्या आयुष्यात पूर्ण रूपानें कलें होतं. अहिंसा पालन पूर्णतया करीत असतांनांहि पुष्कळशा वर्षापर्यंत ते जिवंत राहिलेत आणि जगास आपलें परमतत्त्व समजावीत राहिलेत. त्यांच्या उपदेशानुसारे अन्य असंख्य मनुध्यांनी आजपर्यंत या तत्त्वाचे यथार्थ पालन केले, परंतु कोणालाहि आत्मघात करण्याचे काम पडले नाही ह्याकरिता ही गोष्ट तर सर्वांच्या अनुभवावरून सिद्ध झालेलीच आहे की, जैन अहिंसा अव्यवहार्यही नाही