________________
वाढली आहे. कोणी या अहिंसेला अव्यवहार्य ह्मणजे व्यवहार करण्यास योग्य नाहीं असें ह्मणतो तर कोणी अनावरणीय ह्मणजे आचरण करण्यास योग्य नाहीं असें ह्मणतो. कोणी ह्या अहिंसेरा आत्म्याचा कत करणारी आहे असे क्षणतो तर कोणी राष्ट्राचा नाश करणारी क्षणतो. कोणी झणतो की जैन धर्माच्या अहिंसेने देशाला परतंत्र बनविले आणि कोणी ह्मणतो की या अहिंसेने प्रजेला वीर्यति लगने पराक्रमशून्य बनविले आहे. या प्रमाणे जैन धर्माच्या अहिंसे की पुष्कळ मनुष्यांचे पुष्कळसे कुविचार ऐकण्यांत येतात.
काही वर्षांपूर्वी देशभक्त, पंजाब केसरी, लालाजीनी देखील एक असाच भ्रमात्मक विचार प्रकाशित केला होता, त्यांत महात्मा गांधीजीकडून प्रचारित अहिंसातत्याचा विरोध केला होता, आणि नंतर त्याचें समाधानकारक उत्तर स्वतः महात्माजींनी दिले होते. लासजीसारखे प्रौढ विद्वान् आणि प्रसिद्ध देशनायक होऊन, त्याचप्रमाणे जैनसाधूंचा पूर्ण परिचय ठेवीत असतांही, जर ह्या अहिंसेवियों असें भ्रांत विचार ठेऊ शकतात, तर मग दुसऱ्या साधारण मनुष्यांची गोष्टच काय सांगावी ?
आतांच कांहीं दिवसापूर्वी जी. के. नरीमन नांवाच्या एका पारसी विद्वानानें महात्मा गांधीजीस संबोधन करून एक लेख लिहिला आहे. त्यांमध्ये त्यांनी जैनांच्या अहिंसेविषयीं असेच भ्रमपूर्ण उद्गार प्रकट केले आहेत. मि. नरीमन एक चांगले ओरिएंटल स्कॉलर ह्मणजे पौर्वात्य पंडित आहेत आणि त्यांना जैन साहित्य व जैन विद्वानांचा कांहीं परिचय देखील आहे असें माहीत पडते. जैन धर्माशी परिचित आणि प्राचीन इतिहासाला जाणणाऱ्या विद्वानांच्या मुखांतून जेव्हां असे अविचारी उद्गार ऐकण्यांत येतात, तेव्हां साधारण मनुष्यांच्या मनांत