________________
श्री शांतिप्रभवे नमः जैन धर्माचें अहिंसातत्त्व.
जैन धर्मामध्ये सर्वच आचार आणि विचार फक्त अहिंसेच्या नावर रचिले गेले आहेत. असें तर भारतवर्षातील ब्राह्मण, बौद्ध वगैरे सर्वच प्रसिद्ध धर्मांनी अहिंसेला परम धर्म गणिले आहे आणि सर्व ऋषि मुनि, साधु, संत, वगैरे उपदेशकांनी अहिंसेचे महत्त्व दाखवून, ती स्वीकार करण्यायोग्य आहे असे दाखविलें; तरीही या तत्त्वास जितकें विस्तृत, जितकें सूक्ष्म जितके खोल, आणि जितकें आचरण करण्यास योग्य, जैन धर्माने दाखविले, तितकें दुसऱ्या कोणत्याही धर्माने दाखविले नाही. जैन धर्माच्या प्रवर्तकांना अहिंसातत्त्वास चरम सीमेपर्यंत पोचविलें आहे. त्यांनी फक्त अहिंसेचे कथनच केले नाही, परंतु तिचे आचरण देखील तसेंच करून दाखविले आहे. निरनिराळ्या धर्माचें अहिंसातत्त्व फक्त कायिक बनून राहिले आहे, परंतु जैन धर्माचं अहिंसातत्त्व त्यांच्या पेक्षां पुष्कळ अंशी पुढे वाढून, वाचिक आणि मानसिकाच्याही पुढे आत्मिक रूप बनले आहे. दुसऱ्याच्या अहिंसेची मर्यादा मनुष्य आणि त्याहून जास्त झाले तर पशु पक्ष्यांच्या जगापर्यंत जाऊन समाप्त होते परंतु जैनधर्माच्या अहिंसेची तर काही मर्यादाच नाही, तिच्या मर्यादेत सगळ्या चराचर जीवजातीचा समावेश होतो, तरीही ती तशीच अमित राहते. ती जगासारखी अमर्यादित-अनंत आहे आणि आकाशासारखी सर्व पदार्थ व्यापी आहे. परंतु जैनधर्मातील ह्या माव्य तत्वाच्या यथार्थ रहस्याला समजण्याकरितां फारच थोड्या मनुष्यांनी प्रयत्न केला आहे. जैनांच्या ह्या अहिंसे विषयी लोकांमध्ये फारच अज्ञानता आणि बेसमन