________________
शिष्य मुनि श्री आनंद ऋषिजी महाराजांनी या पुस्तका पासून महाराष्ट्रीय लोकांनाही लाभ मिळावा ह्या हेतूने मराठी भाषेत भाषांतर करून दिले. ह्मणून त्यांचा, त्याचप्रमाणे श्री आत्मानंद जैन ट्रेक्ट सोसायटी अंबाला येथील सेक्रेटरी कडून मराठी भाषेत पुस्तक प्रसिध्द करण्याविषयी आमांस परवानगी मिळाली ह्मणून त्या सोसायटीचा आणि नागपूर चे श्री माणिकराव वालाजी आगरकर जैन मास्तर यांनी या पुस्तकास तपासण्याकरिता जी अमूल्य वेळ दिली ह्मणून त्यांचा, श्री जैन धर्म प्रसारक संस्था धन्यवाद पूर्वक आभार मानीत आहे.
प्राणीमात्रांच्या ठिकाणी करुणा भावना उत्पन्न होऊन जगांत परस्पर सुखाने नांदोत, अशा शुभ मनोकामनेस प्रदर्शित करून ही प्रस्तावना पुरी करितो.
मंत्री