________________
निर्वीर्य हणजे पराक्रमहीन केले. ह्या आक्षेपास करणाऱ्यांचे मत असें आहे की, अहिंसेच्या प्रचारामुळे लोकांत शौर्य राहिले नाही; कां की हिंसेपासून उत्पन्न होणा-या पापा पासून भिऊन लोकांनी मांस भक्षण करणे सोडून दिले आणि मांस भक्षण केल्याशिवाय शरीरांत शक्ति व मनांत शौर्य उत्पन्न होत नाही, ह्मणूनच प्रजेच्या हृदयांतून युध्दाची भावना नष्ट झाली. त्या कारणामुळे विदेशी आणि परधर्मी लोकांनी भारतावर आक्रमण करून, त्यास आपल्या स्वाधीन करून घेतले. याप्रमाणे अहिंसेच्या प्रचाराने देश पराधीन आणि प्रजा पराक्रमशून्य बनली.
अहिंसेविषयी केलेली ही कल्पना नितांत (बिलकूल ) युक्तिशून्य आणि सत्यापासून पराङ्मुख आहे. ह्या कल्पनेच्या मूळांत फारच मोठी अज्ञानता आणि अनुभवशून्यता राहिलेली आहे. जे ह्या विचारांना प्रदर्शित करितात त्यांना एक तर भारताच्या प्राचीन इतिहासाविषयी पत्ता नसला पाहिजे, नाही तर जगांतील मानव समाजाच्या परिस्थितांचे ज्ञान नसले पाहिजे. भारताच्या पराधीनतेचे कारण अहिंसा नाही परंतु भारताची अकर्मण्यता (निरुद्यमित्व ) अज्ञानता आणि असहिष्णुता ( दुसयांच्या बढतीला पाहून सहन न होणें ) आहे आणि या सर्वांचे मूळ हिंसा आहे.
- जेथपर्यंत भारतवर्षांत आहंसा प्रधान धर्माचा अभ्युदय राहिला होता, तेथपर्यंत प्रजेमध्ये शांति, शौर्य, सुख, आणि संतोष यथेष्ट व्याप्त झालेले होते, याप्रमाणे भारताचा प्राचीन इतिहास स्पष्टपणे सांगत आहे. अहिंसा धर्माचे महान् उपासक आणि प्रचारक नृपति मौर्य, सम्राट चंद्रगुप्त आणि अशोक होते, यांच्या काळांत भारतवर्ष परतंत्र झालेला होता काय ? अहिंसा धर्माचे कट्टर अनुयायी दाक्षिणात्य कदंब, पल्लव, आणि चौलुक्य वंशांतील प्रसिद्ध प्रसिद्ध