________________
महावीरचरित्र
याप्रमाणे महावीर तीर्थकरांच्या चरित्राकडे अध्यात्मिक दृष्टीने पाहतांना असे इतरांहून निराळया व असामान्य दृष्टीने पाहावे लागते त्याचप्रमाणे व्यावहारिक दृष्टीने किंवा ऐतिहासिक दृष्टीने त्याच्या चरित्राकडे पाहतांनाहि विशेष । निराळया दृष्टीनेच पाहावे लागते. अवतारांचे वेड ज्यांच्या डोक्यात शिरले बाहे किंवा लोककल्याण व क्रांतीच्या कल्पनेने ज्यांच्या डोक्यांत घर केलेलें आहे तं महावीरस्वामींना अवतार समजतात व त्यांनी वैदिकधर्मात क्रांति करून लोककल्याण केले असे मानतात. पण ही गोष्ट खोटी आहे. तसे पाहिल्यास सर्व पुण्यात्म की जे देवगतीतून मनुष्यगतींत येतात ते अवतारच होत. या दृष्टीने महावीरस्वामींहि अवतारच होत. कारण तेहि देवगतींतून मनुष्य लोकी अवतरले होते. पण जगाच्या उद्धारासाठी अवतरलेले अवतार ते नव्हत. त्यांनी कोणा भकाचे रक्षण केले नाही किंवा दुष्टाचा संहार केला नाही कारण दोन्हीहि त्यांना नव्हते. त्यांनी आत्मकल्याण करून घेतले व भव्यजीवांचे अंतिम ध्येय साध्य केले आणि ते असे करीत असतांना त्यांचे आचरण पाहुन जीवांनी जी कर्मे केली ती क्रांतीला कारण झाली.
एकंदरीत महावीरस्वामींच्या चरित्रापासून प्रत्येक जीवानें जो बोध घ्यावयाचा तो हाच की प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा असल्यामुळे व तोच त्याचा स्वभाव असल्यामुळे सुख मिळविण्याच्या त्याच्या मार्गात कोणीहि जीवाने विघ्न आणू नये. शाश्वतसुख मिळविण्याचा मार्ग एकातिक नसून अनेकांतिक आहे. कोणत्याहि मार्गाचा हट्ट धरून चालणार नाही. हे शाश्वतसुख कोणीहि कोणाला देऊ शकणार नाही. ते ज्याचे त्यानेच मिळविले पाहिजे. जगांत काहीतरी अद्भुत करणे हे माणसांचे ध्येय नसून शाश्वतसुख मिळविणे हेच प्रत्येकाचे ध्येय आह. हे ध्येय माणसापुरतेच परिमित नसून सर्व पशुपक्षी, कृमिकीटक, जीवजंतु व वनस्पति यांनाहि आहे. महावीरस्वामीनी उपदेशिलेल्या अहिंसेचे रहस्य दया लसून सर्वांना आपल्या इतकाच अधिकार आहे ही मान्यता आहे. त्यांच्या अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या व्रतांतील रहस्य हेच की त्यांतच शाश्वत व निरपेक्ष सुख आहे. ईश्वर-कर्तृत्ववाद जो त्यांनी खोडून दाखविला त्याचे कारणहि आत्म्याचे निरुपाधिकत्व व स्वावलंबनच होय. जीवात्म्याला स्वतंत्र कर्तृत्व व भोक्तृत्व आहे यावरच सर्व कर्मतत्त्वज्ञान उभारलेले आहे. सर्व कर्माचा त्याग व क्षय हाच निश्चित मोक्षमार्ग आहे व सम्मज्ञान, सम्यक्दर्शन व
(१३६)