________________
उपसंहार.
सम्यक्चरित्र या रत्नत्रयींच्या अवलंबनानेच तो मार्ग साधेल हे खरे; पण त्यासाठी अमुक त-हेचीच उपासना, व वेष असला पाहिजे असा कदाग्रह त्यांनी प्रतिपादिलेला नाही. म्हणून त्यांच्या तत्त्वज्ञानास अनेकांत वाद म्हणतात. याप्रमाणे महावीरांनी उपदशिलेला मार्ग सर्वसाध्य व परिपूर्ण आहे.
हा मार्ग नेहमीच मुफलदायी व आवश्यक असतो. पण हल्ली जीवाजीवांत जी म्पर्धा चालू आहे; मतामतांचा गलबला माजला आहे, देश, वर्ण व जातीमुळे जे कलह मातले आहेत या सर्व संकुचित भावनेमुळे ऐहिक सुखांतहि जो खंड पडत आहे तो दूर व्हावा अशी इच्छा असणान्यांनाहि महावीरांचा निग्रंथ व अनेकान्त मार्गच पत्करणे भाग आहे. खरे सुख पौद्गलिक उपभोगाच्या त्यागांतच आहे. हे जीव जाणतील तर क्षणिक सुखासाठी इतकी धडपड करून जीवाजीवांत स्पर्धा वाढविणार नाहीत. शेवटी प्रत्येक जीव शाश्वत सुखदायक मोक्षपदालाच जाणार आहे, कारण तोच त्याचा स्वभाव आहे हे जाणून प्रत्येक जीवाला अनुकूल असेल तो मार्ग मुखप्राप्तीसाठी मिळविण्याचा आधिकार आहे हे जर जीव जाणतील तर ते परमताबद्दल असेहिष्णु होणार नाहीत. वनस्पतीपासून पंचेंद्रियप्राण्यापर्यंत सर्व जीवांना या जगांत स्थान आहे व ते राहणारच है जागन जाति, वर्ण, देशादि परिमित बाबींचा विचार करून कोणाचाहि द्वेप करण्यांत अर्थ नाही हे सर्व जीव जाणतील तर बरेच कलह ताबडतोब मिटतील. पण या सर्व गोष्टी लक्षात न घेतां जीव धडपडत आहे व स्वसुखांत माती कालवीत आहे. त्याचीच कर्मे त्याच्या दुःखाला कारण आहेत. दुसरे कोणी त्याला दुःख देत नाही व मुखहि देत नाहीत. दोन्ही त्याच्याच हाती आहेत. त्याची कर्मे त्याला नडत आहेत, या कर्माचा क्षय होऊन नवीं कम करण्याचे टाळून शाश्वत सुख मिळविण्याची सन्मति सर्व जीवांना प्राप्त होचो ही भावना भाव आतां पुरे करतो.
-
APER
समाप्त.
(१३७)