________________
उपमंहार.
जैनधर्म हााहे एक वैदिकधर्मातील पंथ आहे असे मानण्यात येऊ लागले. जैन म्हणजे बनिया व शुद्र असेंच समजण्यांत येऊ लागले. जैनांची लोकसंख्या फारच अल्प राहिली. जिनालये शिवालये, मशिदी किंवा विष्णुमंदिरे बनली. इतकी हीन दशा आली तरी जिनशासनाची शुद्धता काही कमी झाली नाही. सत्यमेवजयते या वचनानुसार फिरून जैनसंस्कृतीची भरभराट झालेली दिसून येईल. तूर्त मात्र जैन-स्कृतिकडे कोणाचे लक्ष नाही. उत्तरकडील जैन व्यापारमम आहेत व दक्षिणेतील जैन पोटाच्या मागे लागलेले आहेत. संस्कृतिप्रसाराची नाही तर नाहीं; रक्षणाचीहि फिकीर कोणास नाही उत्तरेकडील जैनांक्षा दक्षिणेतील जन अधिक मागासलेले आहेत. अर्थातच दक्षिणी भाषांतन जैनव व्यय अलीकडे दिसून येत नसल्यास त्यांत काय नवल : कानडी, तामिल व तेलगु भाषेतील जुने वामय वाचणारेहि जैन दुर्मिळ आहेत; अशा स्थितीत नवी रचना करणारे जैन कोठून मिळणार ! महाराष्ट्रभाषेत पूर्वी जैनवाड्यय होतें किंवा नाही याचे संशोधन अजून व्हावयाच आहे. हल्ली मराठी भाषेत प्राचीन जैनग्रंथ एकहि उपलब्ध नाही. नवीन रचना होत आहे; व होणे जरूर आहे. आम्ही मूळचे गुजराथी असलो तरी काही ढिया महाराष्ट्रांतच गेल्यामुळे महाराष्ट्राचा अभिमान आम्हासहि वाटणे स्वाभाविक आहे. त्यांत पुन्हां इ. स. दहाव्या शतकापूर्वीच्या महाराष्ट्रात सर्वस्वी जैनसंस्कृतीच भरभराटीस पोहोचली होती. असे इतिहासावरून कळत असल्यामुळे तो अभिमान दुणावतो. म्हणून महाराष्ट्राची सेवा करणे आमचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र भाषेत जैनवाकण्याची फार त्रुटि आहे हे जाणून ती वाण दूर करण्याचा यथाशक्ति प्रयल आम्ही करीत आहों जैनवाङ्मयकुसुममालेची सहा पुष्पे आजवर काढली व तरच्या महावीरस्वामीस स्मरून हे सातवें पुष्प महावीरचरित्र म्हणून काढले आहे. अटें येथील विघ्नहरपार्श्वनाथाच्या कृपेनें ऐतिहासिकदृष्टया पाश्वनाथचरित्र लिहिण्याची आमची मनीषा निर्विघ्नपणे पार पडो व मराठी वाङ्मयांत जैनवाड्मयाची अधिकाधिक भरती होत जावो हीच तीव्र इच्छा आहे.
आम्ही येथपर्यंत जें महावीरचरित्र वर्णन केले आहे ते दिगंबरदृष्टीने केलेले आहे. महावीरचरित्राचा विचार आम्हांला सांप्रदायिक दृष्टीने करावयाचा नसून ऐतिहासिक दृष्टीने करावयाचा असल्यामुळे बाबूकामताप्रसादनी आपल्या महावीरचरित्रांत या दृष्टीने जी माहिती दिली आहे ती आम्ही खाली देतो. श्वेता
(१३१)