________________
महावीरचरित्र
तीर्थंकरांच्या प्रासादिक चरित्राचे बाबतीत ' स्तवास्तव तुझ्या, तुझ्यासम कवी - कधी जन्मती ? ' असा प्रश्न टाकूनच स्वस्थ बसावें लागतें.
पण चालू काळ इतिहासमाहात्म्याचा काल आहे. अलीकडे ऐतिहासिक ज्ञानास विशेष महत्व देण्यांत येते. म्हणून तीर्थंकरांचे प्रासादिक वर्णन जरी करता आले नाही तरी ऐतिहासिक वर्णन करणें मात्र अत्यंत अवश्य होऊन बसलें आहे. हे कामसुद्धां कांहीं साधें नाहीं. यालाहि बन्याच संशोधकबुद्धीची, व विशेष लेखनशैलीची जरूरी आहे. जॉर्ज, हेनरी, व्हिक्टोरिया, नेपोलियन, अकबर, अवरंगजेब वगैरेंच्या चारित्रांचीं बाउंच्या बाडे प्रसिद्ध करतां येतील. कारण या व्यक्ति अलीकडेच होऊन गेल्या असल्यामुळे साधने मिळू शकतात. पण अडीच हजार वर्षापूर्वीच्या महात्म्यांच्या चरित्राची सामुग्री कोठून मिळवावयाची ! सुदैवानें म. बुद्ध व भगवानमहावीरांचे बाबतीत पूर्वाचार्यानीं बरीचशी माहिती धर्मशास्त्रांतून ग्रथित करून ठेविली असल्यामुळे यांची चरित्रे लिहिणे शक्य झाले आहे. तरी पण ही माहिती झाली तरी पुराणवजाच ! यांतून इतिहास काढून त्यांचे कितीहि संगतवार चरित्र लिहिले तरी अलिकडील व्यक्तींची चरित्रे जशी मिळू शकतात तशी कांही ती चरित्रे होणार नाहींत. अशा स्थितीतहि बाबूकामताप्रसादजीनी हिंदी भाषेत ऐतिहासिकदृष्टीनें महावीरचरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला व तो कांहीं अंशी सावला आहे. हिंदी भाषेशिवाय इतर कोणत्याहि भाषेत असें महावीर चरित्र नाही.
प्रस्तुत लेखकाची विद्वत्ता ऐतिहासिक चरित्र लिहिण्याइतकीहि नाहीं; मग प्रासादिक चरित्र लिहिण्याची गोष्ट दूरच राहिली. काव्यमय चरित्र लिहिण्याचा प्रयत्न होण्याजोगा आहे. पण चालू काळांत त्यांची मातब्बरी नाहीं. हल्ली ऐतिहासिक व गद्यमय चरित्राचीच विशेष कदर करण्यांत येते. तसे चरित्र कानडी भाषेत श्री. भिडे यांनी लिहिल्याचें ऐकिवात आहे; पण तें पुस्तक आम्हास पाहावयास मिळालें नाहीं. व मिळाले तरी तें आम्ही समजूं शकणार नाहीं. गुजराथी भाषेत महावीरचरित्रं आहेत व श्वेतांबरदृष्टीनें तीं लिहिलेलीं आहेत. मराठी भाषेत तसें चरित्र नसावें याबद्दल मनाला राहून राहून दुःख बाटत होते. महाराष्ट्रांत इतर प्रांतांपेक्षां आधुनिक विद्वानांची संख्या अधिक. ते बहुतेक वैदिकमताचे असल्यामुळे त्यांनी ऐतिहासिकदृष्टया वैदिकधर्माच व पुरुषांचे ग्रंथ लिहून 'वेदोच्छिष्टं जगत्सर्वम् ' ही व्यासोति चालू काळांतहि ( १२६ )
1