________________
उपसंहार.
खरी करण्यासाठी चंग बांधला. पण त्यामुळे सत्य दडपले जात असलेले आम्हाला सहन होईना. जैनधर्म सर्वात प्राचीन असून तो भारतीय आहे. वैदिकधर्म बाहेरून आला आहे. जैनधर्माची छाप वैदिकधर्मावर पडल्यामुळेच तो आर्य म्हणण्यास लायक झाला आहे. नाहीतर हिंसात्मक बलिदान व पंचभूतात्मक प्रकृतींत इंद्रादिदेवांना कल्पून त्यांची भयाकुल अंतःकरणाने पूजा करण्यापलीकडे वैदिकमतांत आरंभी काहींच रहस्य नव्हते. न बोलेल त्याची द्राक्षेहि पडून राहतील व बोलेल त्याची आंबट बोरेहि खपतील या म्हणीप्रमाणे ख्रिश्चन, बौद्ध व वैदिकमतांचा डंका गाजत आहे. व जनधर्माच्या नगा-यावर कोणीहि भरत झडवीत नाही अशी स्थिती पाहून पात्रता नसतांनाहि हा प्रयत्न आदरिलेला आहे.
जनांचा प्राचीन गौरव किती म्हान वर्णावा ? उत्तर ध्रुवाकडील टोळ्या इकडे येण्यापूर्वी भरतखंडांत एकमेव जैनधर्मच होता. वदिक मिथ्यात्वाचा प्रसार झपाट्याने होऊ लागल्यानंतरहि जनतत्त्वज्ञानाची छाप पैदिकतत्त्वज्ञानावर पडतच होती. महावीरकालापर्यंत जैन लोकांचे व संस्कृतीचे वर्चस्व कायम होते. नंतरच्या बौद्धलाटेत अनेक वैदिकमतें पढे सरसावली व बौद्धमताप्रमाणेच जिनशासनालाहि उतरतीकळा लागली. तथापि दक्षिणेत जैनांचे वर्चस्व बरेंच होते. पण उत्तरध्रुवाकडील टोळधाडीने जसा जनसंस्कृतीवर पहिला हल्ला चढविला तसा महंमदी टोळ्यांनी अकराव्या शतकांत दुसरा हल्ला चढविला व पंधराव्या शतकाचे अखेरीस जैनांची लोकसंख्या बरीच कमी झाली व त्यांचे राजकीय वैभवहि नष्ट झाले.
अखिल भारताचा विचार सोडून देऊन दक्षिण भारताचा विचार केला तरी गंग, राष्ट्रकूट, होयसाल व कलचूरी ही राजघराणी सर्वस्वी जैन होती व पल्लव, संतार, चालुक्य, कदंब व रट्ट वगैरे राजघराण्यातील बरेच राजे जैन होते. बसवेश्वर व रामानुजाच्या कालापासून जन राजेहि शैव व वैष्णव होत गेले आणि जे जन राहिले त्यांचा हि शेवटी पराजय झाला, राजकीय पाठबळ गेल्याबरोबर जैनांची लोकसंख्याहि घटली व राहिले तेवढे बहुतेक शेतकरीच राहिले. दक्षिणेतील प्रमुख • भाषांना ज्यांनी जन्म दिला व ज्या भाषांतील आद्यग्रंथ जैनच आहेत, त्या भाषेप्रमाणेच संस्कृत भातहि ग्रंथरचना करून ज्यांनी उभयभाषा कोविद म्हणवून घेतले ते जैनब्राह्मण गेले व त्यांच्याबरोबरच त्यांचे निःसंतान झाले. उपाध्ये व
(१२७).