________________
उपसंहार.
आहे. ती पुरविणारा निग्रंथ महात्मा हवा आहे. कालानुसार तो जन्माला येऊन सम्यधर्माचा प्रसार करीलच; पण तोपर्यंत प्रत्येकाने शक्तिनुसार शुद्ध धर्माचा प्रसार करण्याची खटपट केली पाहिजे. हटवादी लोकांना काहीच पटणार नाही. व त्याच्या उद्धाराची आशाच नाही. पण सत्यशोधक व सत्याग्रही लोकांची समजूत पाडणे शक्य असते व इष्टहि असते. जैनधर्म हा पूर्ण सत्य व अव्याबाध आहे. खन्या मुमुक्षूनां तो पटलाच पाहिजे व तेच तो आचरणांत आणूं शकतील. आद्यतीर्थकरापासून निर्वेधपणे चालत आलेलें तत्वज्ञानच महावीर तीर्थकरांनी सांगितले. ते त्याच्यानंतर शेकडो वर्षे मुमुक्षूनी आचरिलें; आज आचरीत आहेत, व पुडंहि आचरतील.
प्रकरण तेरावें.
उपसंहार.
तीर्थकरासारख्या अलौकिक व्यक्तीचे चरित्र लिहिण्यास केवल ज्ञानीच पाहिजेत; तरच ते अगदी प्रासादिक होईल. त्यांचे चरित्र लिहिण्यास गणधर लायक होते. पण त्यांनी लिहिलेली चरित्रे उपलब्ध नाहीत. चोवीस तीर्थकरनिंतर जे अनंत सिद्ध होऊन गेले तेहि तीर्थकरांचे प्रासादिक चरित्र लिहिण्यास लायक होते; पण त्यांपैकी एखाद्या सिद्धाने लिहिलेले एखाद्या तीर्थकरांचे चरित्रहि आढभाढळत नाही. काही मुनींनी व पंडितांनी लिहिलेली चरित्रे आहेत; पण रामचरित्र लिहिणा-या वाल्मिकीप्रमाणे व कृष्णचरित्र लिहिणा-या व्यासाप्रमाणे या मुनींची व पंडितांची ख्याति नाही. राम व कृष्णचंद्रांची चरित्रे व्यासवाल्मिकीच्या आटोक्यांतील होती. तशी तीर्थकरांची चरित्रं मुनिपंडितांच्याहि भावाक्याबाहेरची आहेत. प्रारंभी लिहिल्याप्रमाणे त्याचे वर्णन करण्यास केवलीच पाहिजेत. इंद्रियातीत ज्ञानाचा हा विषय असल्यामुळे त्यांचे यथार्थ व प्रभावी वर्णन केवलज्ञान्याशिवाय कोण करू शकणार ? म्हणून पंतकवींनी म्हटल्याप्रमा
(१२५)