________________
महावीरचरित्र
सुलभ मतांचा जोर वाढून जैनधर्मासहि उतरती कळा लागली. तथापि दक्षिणेत इ. स. च्या सोळाव्या शतकापर्यंत जैनराजे असल्यामुळे जैनलोकसंख्या इकडे बरचि होती. गुजराथेंत शैव, वैष्णव व जैन या तिघांचे समसमान प्राबल्य अजूनहि आहे व कुमारपाल राजाचे वेळीं जैनधर्माचा प्रसार गुजराथेत विशेष होता. महाराष्ट्रांत महानुभव व वारकरी पंथाच्या प्रसारापूर्वी जैनमताचा प्रसार बराच होता. कर्नाटक, आंध्र, व तेलंगणांतहि जेनराजे, पंडित, साधु, : कारागीर व व्यापारी सोळाव्या शतकापर्यंत बरेच होते. पण पुढे वैष्णव व लिंगायत मताचा जोर वाढून जैन लोकसंख्येस उतरती कळा लागली. असो.
पंडितांच्या वादविवादावर, राजांच्या लहरीवर व लोकमताच्या छंदावर व्यवहारांत कोणत्याहि धर्ममताचा प्रसार अवलंबून असतो. म्हणून केवळ लोकसंख्येवरून कोणत्याहि धर्माचा श्रेष्ठ कनिष्टपणा ठरवितां येणार नाहीं. नीतिसमाजासाठी असते; पण धर्म मुख्यतः अध्यात्मिक कल्याणासाठी असतो. केवळ या दृष्टीनें पाहतां महंमदी, ख्रिस्ती, पारशी व बौद्धमतापेक्षां हिंदू तत्त्वताने श्रेष्ठ आहेत ही गोष्ट आतां सर्वमान्य झाली आहे. हिंदूतत्त्वज्ञानांतहि वैष्णव, शाक्त, गाणपत्य, शेव, सिख वगैरे पंथापेक्षां वेदांत तत्त्वज्ञान अध्यात्मिक दृष्टीने उच्चप्रतीचे आहे ही गोष्टहि निर्विवाद आहे. ज्ञानी लोकांनी जैन - तत्त्वज्ञानाचे सार्वगिकत्व व सर्व श्रेष्टत्व असेंच वर्णिले आहेत.
जेनेतर विद्वानहि जैनधर्माची शुद्धता व सर्व श्रेष्ठता अलीकडे कबूल करूं लागले आहेत व जसा जसा जैनदर्शनाचा अभ्यास अधिकाधिक होत जाईल तसतसा त्याचा श्रेष्ठपणा निर्विवादपणे मान्य केला जाईल हे नि:संशय होय. अहिंसेच्या प्रभावाचे महत्त्व म. गांधी जगाला प्रत्यक्ष पटवीत आहेत. आचार्य श्री. शांतिसागरासारखें निर्ग्रथमनि जैनदर्शन आचरण्यांत आणून दाखवत आहेत. विद्यावारिधी चंपतरायँजनांनीं सर्व धर्मांचा तुलनात्मक विचार करून जैनदर्शनांत वर्णिलेले तत्त्वज्ञानच सर्व धर्माचे सार कां असलें पाहिजे व कसें आहे तें दाखवून दिले आहे. इतर पंडितहि आपापल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. पाश्चिमात्य देशांतून निरीश्वरवाद अनात्मवादाच्या अर्थाने वाढत आहे. ईश्वरकर्तृत्व विद्वानांना पटेनासे झाले आहे; पण जैनदर्शनांतील वीतराग, निरुपाधिक व चैतन्यस्वरूप स्वयंभू ईश्वराची कल्पना विद्वानापुढे मांडल्यास आस्तिक्यबुद्धि वाढणें शक्य आहे. जगांतील विद्वानांना जैनदर्शनाचीच तहान लागलेली स्पष्ट दृग्गोचर होत ( १२४ )