________________
महावीर पश्चात्काल.
नाहीं. म्हणून दक्षिणेत सर्व धंद्यांचे वैश्य आहेत व क्षत्रिय शेतकरी आहेत आणि म्हैसूर संस्थानांत थोडे ब्राह्मणहि आहेत.
श्वेतांबर मताचे जैन बहुतेक गुजराथ व मारवाडांतच आहेत. कारण या भागांतच तो पंथ निघाला व पुढे त्याला राजाश्रय मिळाला. कुमारपालादि श्वेतांबर जैन राजे गुजराथेंत होऊन गेले. जैनधर्माच्या लोकसंख्येचा -हास होण्यास अनेक कारणे आहेत. त्यापैकी श्वेतांबर, दिगंबर भेद हेहि एक कारण मानण्यांत येतें. पण आमच्यामतें हैं कारण गौण आहे. सुलभ व व्यवहार्य मत असेल तिकडे सामान्य लोकांचा ओढा अधिक असतो. त्यामुळेच बौद्ध, शैव,
व, शाक्त वगैरे व अलीकडे महंमदी व ख्रिस्ती मतांचा फैलाव झालेला आहे. दिगंबराइतकेच श्वेतांबर जैनधर्मप्रेमी आहेत. जैनधर्माचा प्रसार करण्यांत आत्माराम महाराज, धर्मविजय महाराज, श्री वीरचंद गांधी वगैरे श्वेतांबरांनी बरीच मेहनत घेतली आहे. श्रीमद राजचंद्रासारखे मोठे तत्त्वज्ञानी श्वेतांबरांतच झाले व म. गांधीही त्यांचीच जगाला देणगी होय. मद्य, मांस व परस्त्रीगमन या व्यसनांची बाधा म. गांधीच्या मातोश्रीने जर जैनसाधुपुढे त्यांच्याकडून घेववली नसती व आफ्रिकेतून श्रीमद राजचंद्राशी त्यांचा पत्रव्यवहार झाला नसतां तर बॅ. मो. क. गांधी म. गांधी झाले असते किंवा नाहीं याची वानवाच आहे. तेव्हां श्वेतांवरमतामुळे जैनधर्माचा प्रभाव कायम राहिला ही गोष्ट नाकारून चालणार नाहीं. शिवाय बौद्धमत हिंदुस्तानांत नामशेष झालें असेल तरी मायावाद व अहिंसेच्या रूपाने ते जसे जिवंत आहे तसेच शैव, वैष्णवादि हिंदूनीहि जैनमत जिवंत ठेवले आहे असेंहि म्हणता येईल. महावीर तीर्थकरांच्या प्रभावी उपदेशाचा परिणाम हिंदी जनतेवर कायमचा झालेला आहे. जैन लोकसंख्या कमी असली तरी तो इतर पंथांच्या अनुयायावर बराच झालेला आहे हे लक्षांत घेणें जरूर आहे.
एकंदरीत भगवान महावीरांनंतर सहा शतकेपर्यंत जैनधर्माचा प्रभाव हिंदुस्तानांत कायम होता व त्याचा प्रचार परदेशांतूनहि झाला. मोठमोठे राजे जैन होते. महान जैनसाधु व पंडित होऊन गेले व हिंदुस्तानांतील बहुसंख्याक जनता जैनच होती. पण वीरनिर्वाणानंतर सहाशे वर्षांनी बौद्धमताची स्पर्धा सुरू झाली. ही स्पर्धा इ. स. च्या आठव्या शतकांपर्यंत चालू राहिली व नंतर वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन झाल्यामुळे बौद्धधर्माचा -हास झाला. नंतर वैष्णव व शैव, शाक्तादि ( १२३ )