________________
महावीर पश्चात्काल.
याप्रमाणे इ. स. पू. पहिल्या शतकापर्यंत जैनशासनाचे वर्धन आविच्छिन्नपणे निग्रंथ मुनिगग व अनेक सम्राटांनी केले; पण त्यानंतर मुनिसंघांत वरीलप्रमाणे मतभेद माजला. व साम्राज्यहि लयाला गेले. अनेक राजे स्वच्छंदाने राज्य करूं लागले व मुनिगणहि स्वच्छंदाने मतप्रसार करू लागला. इतर मतांना पुढे येण्यास हा काळ अनुकूल ठरला. बौद्धमतच काय ते इ. स. सातव्या शतकापर्यंत जैनमताच्या बरोबरीने वाढीस लागले. या काळांत जैन व बौद्ध हे दोघे समसमान होते असे म्हणावयास हरकत नाही. एक राजा जैन असे तर दुसरा बौद्ध होई व आपल्या प्रजेलाहि वौद्ध बनवी. पुढे पुन्हां तोच जैन बने व प्रजेलाहि जैन बनवी असाच फेरबद्दल या पांचसहा शतकांत चालला होता. स्वतः बुद्धाच्या काळीहि जो धर्म टिकू शकला नाही. त्याने भारतवर्षातील प्रमुख धर्माला सामना देण्याइतके बळ मिळवावे असे कसे झाले ? असे होण्याचे कारण नंतरच्या बौद्धाचार्यांनी बौद्धमतांत केलेली सुधारणाच होय. बुद्ध काली सामान्य नातीला प्राधान्य होते व तत्त्वज्ञान नकारात्मकच होते. नंतरच्या बौद्धाचार्यानी तत्वज्ञान रचले व तात्विक दृष्टया इतर दर्शनांचे खंडण करून स्वमताचे समर्थन करण्यास प्रारंभ केला. याप्रमाणे बुद्धिमानावर जेव्हांपासून बौद्धाचार्य विजय मिळवू लागले तेव्हांपासून त्यांच्या मताची सरशी होऊ लागली. त्याचा स्वीकार राजे व इतर प्रजाहि करूं लागली. पण पुढे बुद्धिबलावरच सर्व कसरत होऊ लागल्यामुळे आणि राजाच्या पाठबळावरच सर्व करामत बौद्धाचार्य करू लागल्यामुळे सामान्य नतिीवरचेहि त्यांचे अवधान लुटले व भिक्षुभिक्षुगतिंच अनाचार माजला व त्याचा परिणाम समाजावरहि होऊ लागला. तेव्हां फिरून जैनाचार्याची सरशी होऊ लागली. या काळांतील जैनग्रंथ पाहिल्यास त्यांतील निम्मा आवक भाग बौद्धांचे खंडन करण्यांतच खर्ची पडला आहे असे दिसून येईल. यावरुन जैनाचायांनीच शेवटी बौद्धमताचें पारिपत्य केलें असें म्हणावयास हरकत नाही.
भगवान महावीर व म. बुद्धानी हिंसात्मक कर्मकांडाचे जे एकदां पेकाट मोडले ते कायमचेच होय. हिंसात्मक यज्ञानी फिरून डोके वर काढले नाही इतका जबरदस्त टोला या दोन महात्म्यांनी त्या हिडिस संस्थेला दिला. ब्राह्मणांचे बंडहि या दोन महापुरुषांनी कमी केले व म्हणूनच या दोघांना अलीकडील वेदमतानुयायी आपल्यातील मोठे बंडखोर समजतात. श्रीरामस्वामी आयगार आपल्या — दक्षिणेतील जैनधर्म ' या पुस्तकांत म्हणतात, 'कांही विद्वान जैनधर्माला हिंदू
(११९)