________________
महावीरचरित्र
मधील बंडखोर व वर्णव्यवस्थेचा उच्छेद करणारा आहे असें म्हणतात. पण ते सर्वस्वीं खोटें आहे. महावीर कालापर्यंत ब्राह्मणांनी इतर वर्णाशी हलकेपणानें वागण्याचा जो प्रघात पाडला होता तो बंद पाडून क्षत्रिय वर्णाचें श्रेष्टत्व प्रस्थापित केलें व इतर वर्गांनाहि त्यांनी बरोबरीनें वागविलें हें खरें; पण याचा अर्थ वर्णव्यवस्थेचा उच्छेद केला असा होत नाहीं. जैनसमाजांतहि वर्णव्यवस्था आहे; पण त्यांतील उच्चनीच कल्पना नाहीं." तेव्हां हिंसात्मक यज्ञांचे बंड व वर्ण व्यवस्थेतील उच्चनीचपणा या दोहोंचा नायनाट भगवान महावीर व म. बुद्धांनी केला हें उघड आहे. त्याबरोबरच इंद्रवरुणादि देवतांचे खरे स्वरूप काय आहे तेंहि महावीर तीर्थंकरांनी दाखवून दिलें. मनुष्यगतीप्रमाणेच या देवतांची एक गति आहे. ते मुक्त झालेले पूजनीय देव नव्हत. अर्थातच त्यांचे पूजन करण्याची जरूरी नाही. व त्यासाठी हिंसात्मक यज्ञ करण्याची तर मुळींच आवश्यकता नाहीं. असें त्यांनी दाखवून दिलें. म. बुद्धाने तर या जन्मानंतरच्या जीवनाची पंचाईत करण्याचेंच टाळलें; मग त्या भावी जीवनांतील सुखासाठी यज्ञांचा एवढा खटाटोप कशाला हवा ? भगवानमहावरि व म. बुद्धांच्या या उपदेशाचा परिणाम सर्व समाजावर चांगला होऊन असंख्य लोक जैन व बौद्ध झाले आणि जे राहिले त्यांनीहि आपला उपासनामार्ग बदलला. वेदांतूनच नवीन शिव किंवा रुद्र, शक्ति, विष्णु, गणपति वगैरे देवांना शोधून काढण्यांत आले व त्यांची उपासना सुरू झाली. राम, कृष्ण वगैरे क्षात्रवीर की, ज्यांचा महिमा त्या काळींहि लोक गात होते त्यांना या देवांचे अवतार ठरविण्यांत आले व अनेक पुराणे रचण्यांत आली. व्यासोक्त व इतर पुराणे इ. स. च्या सातव्या शतकापर्यंतच झालेली आहेत. बरीचशी उपनिषदेहि याच काळांत झालेली आहेत. अर्थात् वेदानुयायामधूनहि कर्मकांड अजीबात लोपून ज्ञानकांड व उपासनाकांडानेच या काळांत उचल खाल्लीं होती. जुन्या इंद्रादि देवतापैकीं सूर्य व अग्नि यांची उपासना कायम राहिली व इतरांचें पूजन कांहीं ठराविक कर्मापुरतेंच राहिलें. अग्निहोत्र राहिले; पण त्यांतील हिंसा गेली. एकंदरीत अनेक देवतोपासना चालू राहिली; पण ती रुद्रादिदेवांची; इंद्रादि देवतांची नव्हे.
आठव्या शतकांत जैन व बौद्धांची चुरस बरीच वाढलेली दिसते. बौद्धराजांनी जैनांची कत्तल करण्यांपर्यंत मजल नेली. उलट जैनराजांनीहि त्यांचा सूड उगविला असला पाहिजेच; पण बौद्धभिक्षु व राजांनी जितका निर्दयपणा ( १२० )