________________
महावीरचरित्र
श्वेतांवरसांप्रदायांत या बाबतीत खालील गाथा प्रमाण मानली जाते. छव्वाससहस्सेहिं नवुजरेहिं गयस्स वीरस्स । तो वोडियाण विही रहवीरपुरे समुपन्ना || प्रभालक्षण नामक ग्रंथांत जिनेश्वरसूरींनी दिगम्बरांचे म्हणणे म्हणून अशी गाथा दिली आहे. छव्वास सएहिं न उत्तरैहिं तइयासिद्धिं गयस्य वीरस्स । कंबलियाणं दिट्ठी बलही पुरिए समुप्पण्णा ॥ याप्रमाणें श्वेतांबरमताच्याच दोन ग्रंथांत एकाच वेळीं दिगंबर व श्वेतांबरमताची उत्पत्ति झाली असा उल्लेख आढळतो. वरील दोन्ही गाथा बहुतेक सारख्याच आहेत. पण दिगंबरमत फार पूर्वीपासून होतें ही गोष्ट इतर धर्माच्या ग्रंथावरूनहि सिद्ध होत असल्यामुळे वरील गाथांतून दिलेल्या काळी श्वेतांबर मतच उत्पन्न झाले असले पाहिजे हे स्पष्ट आहे. डॉ. स्टीव्हन्सनसाहेब या बाबतीत कल्पसूत्राच्या प्रस्तावनेत लिहितात की, ' इ. स. पूर्वी पहिल्या शतकांत वेतांबर मत निघाले असले पाहिजे. दिगंबर नव्हे. ' डॉ. हॉर्नेलसाहेब या बाबतीत लिहितात 'इ. स. पूर्वी ३१० चे सुमारास मगधदेशांत बारा वर्षाचा दुष्काळ पडला. त्या वेळी मौर्य चंद्रगुप्त राज्य करीत होते. भद्रबाहु त्यावेळी जैनसंघाचे आचार्य होते. दुष्काळामुळे कांहीं शिष्यासह भद्रबाहु कर्नाटकांत गेले. मगध देशांत जे राहिले होते त्यांचे आचार्य स्थूलभद्र होते. दुर्भिक्ष संपल्यावर पाटलीपुत्रांत एक जैनसमे लन करण्यांत आले. त्यावेळी अकरा अंग व चौदा पूर्व ग्रंथ लिपिबद्ध करण्यांत आले. दुष्काळात जैनसाधुंच्या आचरणांत फरक पडला. सामान्य साधु कांहीं वस्त्र धारण करूं शकतात. पण अंतिम दर्जाच्या साघनीं नमच राहिले पाहिजे असा आजवर नियम होता. पण दुष्काळांत आहार मिळेना म्हणून नग्न साधुनीं श्वेतवस्त्र धारण करून भिक्षा गोळा करण्यास सुरवात केली पण दक्षिणेत गेलेल्या मात्र दिगम्बरत्व सोडलें नाहीं. ते मुनि मगध देशांत परत आले तेव्हां श्वेतांबरत्व जैन साधूंचे बाबतीत अगदी रूढ होऊन गेले होते. त्यामुळे मुनिसंघांत भेद पडला. ' महावीरस्वामींच्या निर्वाणानंतर जैनसंघांत मतभेद झाला असा मोघम उल्लेख बौद्ध ग्रंथांतून आहे. तेवढ्यावरून हा मतभेद भद्रबाहुस्वामींच्या पूर्वीहि होता; पण त्यांच्यानंतर दुष्काळामुळे तो मोठ्या प्रमाणांत दृग्गोचर झाला असे. प्रो. जेकोबी व कांहीं पौर्वात्य विद्वानहि म्हणतात. पण वरील विवरणच अधिक ग्राह्य वाटतें.
( ११८ )