________________
महावीर पश्चात्काल.
देवाची पूजा सुरू झाली व श्वेताम्बर लोक आजतागायत ती करीत आहेत. त्या व्यंतरदेवाच्या नांवानेंच पहिली बलिपूजा श्वेताम्बर करतात. भावसंग्रह हा ग्रंथ दहाव्या शतकांतील आहे. भट्टारक रत्ननंदीनी वरीलपेक्षां अधिक माहिती याप्रमाणे दिली आहे. ' भद्रबाहुस्वामींनी भविष्य कथन केल्यावर बारा हजार साधु त्यांच्या बरोबर दक्षिणेत गेले; पण रामल्य, स्थूलाचार्य व स्थूलभद्र हे साधु आपापल्या संघासह उज्जयिनीतच राहिले. दुष्काळ सुरू झाल्यावर ते शिथिलाचारी झाले. भद्रबाहुस्वामी स्वर्गाला गेल्यानंतर दक्षिणेतील दिगंबरसाधु परत उज्जयिनीला आले. तेव्हां शिथिलाचार सोडण्याबद्दल तेथील मुनि संघाला सांगण्यांत आलें. स्थूलाचार्य असें सांगतात म्हणून शिष्यांनी त्यांना मारून टाकले तेव्हां ते व्यंतर देव झाले. तेव्हांपासून त्यांना वेताम्बर कुलदेव म्हणून पुजित आहेत. या शिथिलाचान्यांनी अर्थफालक- नांवांचा सांप्रदाय काढला त्यानंतर बन्याच काळाने उज्जयिनीत कीर्तिराजा झाला. त्याची कन्या वहभीपूरच्या राजाला दिली होती. राजकन्या चंद्रलेखा अर्धफालक साधूची भक्त होती. ती सांप्रदायाच्या मुनीनां राजवाड्यांत बोलावीत असे. अर्धकालक साधू नग्नच असत; पण अंगावर एक वस्त्र नुसतें टाकीत. राजाला हें रुचलें नाहीं. त्याने त्या साधना वस्त्रे दिलीं व तीं त्यांनी परिधानहि केली. या साधूंचा मुख्य जिनचंद्र होता. ' यावर पं. नाथूराम प्रेमी म्हणतात. 'देवसेनसूरि व रत्ननंदी यांच्यावर दिलेल्या वर्णनांत बराच फरक आहे भद्रबाहु स्वामीना देवसेनसूरि निमित्तज्ञानी म्हणतात व रत्ननंदी पंचमश्रुतकेवली म्हणतात. दिगंबरंग्रंथावरून भद्रबाहस्वामी वीरसंवत् १६२ व श्वेताम्बरग्रंथाप्रमाणे वीर सं. ६०३ मध्ये निर्वाणाला गेलें असें मानलें जातें. या कालांत साडेचारशे वर्षांचें अंतर आहे. रत्ननंदीने भद्रबाहुकालीन मताला अर्धफालक नांव दिले व नंतरच्या मताला श्वेताम्बर म्हटले दोन्ही ग्रंथांच्या उत्पत्तिस्थानांतहि फरक दाखविण्यांत आला. प्रवर्तकांची नांवेंहि निराळी देण्यांत आली. दिगंबर सांप्रदायांत कुंदकुंदाचार्य जितके मानले जातात, तितकेच श्वेताम्बरांत स्थूलभद्र मानले जातात, अर्थफालक नांवाचा सांप्रदाय निघाल्याचें वर्णन इतर कोणत्याहि ग्रंथांत नाहीं. म्हणून रत्ननंदीचं वर्णन बनावट आहे.' पं. नाथूरामजींनी आपल्या म्हणण्याला अधिक आधार दिलेले नाहीत. म्हणून रत्ननंदीचे वर्णन बनावट म्हणतां येत नाहीं. पं. नाथूरामप्रेमींचा वरील अभिप्राय बाबू कामताप्रसादजींना मान्य नाहीं.
( ११७ )