________________
महावीरचरित्र
गणींना शान्त्याचार्य ह्मणून एक शिष्य होते. त्यांचा जिनचंद्र नावाचा शिष्य शिथिलाचारी झाला. स्त्रीजन्मांत जीवांना मोक्षप्राप्ती होऊ शकते, असे तो प्रतिपादूं लागला. 'केवलज्ञान्यांनाहि आहार घ्यावा लागतो. व म्हणून त्यांना रोगही होतात. वस्त्रधारण करणारे मुनिहि मोक्षाला जातात. महावीरस्वामींच्या गर्भाचे अपहरण झाले होते. प्रासुक आहार कोठेहि घेतां येतो, वगैरे आगम विरुद्ध मिथ्यात्वाचा फैलाव करून तो पहिल्या नरकाला गेला.' देवसन सूरिकृत भावसंग्रह नांवाच्या ग्रंथांत खालीलप्रमाणे माहिती आहे. 'विक्रमराजाच्या मृत्यूनंतर १३६ वर्षांनी सोरठ देशांतील वल्लभी नगरांत श्वेताम्बरसंघ निघाला. उज्जयिनी नगरीत भद्रबाहु म्हणून एक आचार्य होते. ते निमित्तज्ञानी होते. बारा वर्षेपर्यंत चालणारा एक मोठा दुष्काळ पडणार आहे असे त्यांनी मुनिसंघाला सांगितले. म्हणून तो देश सोडून मुनि अन्यत्र विहार करूं लागले. त्यांपैकी शान्त्याचार्य सोरठ देशाला गेले. पण ते तेथे गेल्यानंतर त्या देशांतहि दुष्काळ पडला. भुकेले लोक दुसन्याची पोटें फाडून अन्न खावं लागले. अशी स्थिति पाहून पांढरे कांबळे, दंडा, तुंबा, पात्र, आवरण, व सफेत कपडा त्यांनी धारण केला व भिक्षा गोळा करून ते उपजीविका करूं लागले. निग्रंथ मुन्नीची वृत्ति सोडून दिली व स्वच्छंदाने याचना करून, बसून ते खाऊ लागले. दुर्भिक्ष नाहीसे झाल्यावर शांत्याचायांनी शिष्यसंघाला बोलावून फिरून नम बनण्याची आज्ञा केली; पण चटावलेले शिष्य थोडेंच ऐकतात . ते म्हणाले दिगम्बरवतात किती कष्ट आहेत. नाम राहावे लागते. उपवास करावे लागतात. एकेक दिवस भोजन मिळत नाही, कारण अभिग्रह जुळत नाही. मनाला वाटेल ते खावयाला मिळत नाही, वाटेल तेथे जाता येत नाही. मौन पाळावे लागते. इमारतीत राहता येत नाही. भूमिशय्या व केशलोच करावा लागतो. या दूषम कालांत हा दिगंबर वेष आवश्यक नाही व योग्यहि नाही. शिष्यांचे हे म्हणणे शान्त्याचार्यांना रुचेना. तसे केल्यास परंपरेचा उच्छेद होईल, जिनाज्ञेचा भंग होईल व मिथ्यात्व वाढेल असे त्यांनी म्हटल्याबरोबर शिष्यांनी त्यांना मारून टाकलें व शान्त्याचार्य मरून व्यंतरदेव झाले. नंतर त्या शिष्यसंघाने श्वेताबरत्वाला अनुकूल अशी शास्त्र रचना केली व तसा उपदेश जैनसंघाला करण्यास सुरवात केली एवढेच नव्हे तर दिगंबरमताची निंदा करूं लागले. शान्त्याचार्याचा व्यंतरदेव या शिष्यांना पीडा देऊ लागला तेव्हा त्या व्यंतर