________________
महावीर निर्वाणकल्याणक.
करून नंतर मोक्षप्राप्ती करून घेतली आणि हेच सत्य आहे. महावीरस्वामींच्या निर्वाणानंतर करण्यात आलेल्या दीपोत्सवाची परंपरा अजून चालू माहे व तिलाच आपण दीपावलीचा सण म्हणतो. या सणाला वाटेल ती कल्पित कारणे अनेकांकडून सांगितली जातात. पण खरं कारण वीरनिर्वाणमहोत्सवाचेंच आहे. आणि दुसरे दिवशी वीरसंवतचे नवें वर्षहि मुरू होते. असो. बगिचांतील त्या निर्माणस्थानावर एक स्तूप उभारण्यांत आला होता म्हणतात; पण आज तर त्याचे अस्तित्व नाही. याप्रमाणे महावीर तीर्थकरांचे दिव्य आयुष्य पूर्ण झाले. ते स्वतः अव्यायाध सुख भोगण्यास गेले व इतर जीवांनाहि त्या मोक्षशलित येण्याचा मार्ग दाखवून गेले आहेत. त्या मार्गाला अनुसरणे हे ज्याच्या त्याच्या हातचे काम आहे. कर्मग्रंथि जितक्या कमी बनतील तितक्या लवकर मोक्ष पदवी प्राप्त होईल. सर्व भव्यजीवांना केव्हांना केव्हां तरी त्या स्वाभाविक स्थितीस एकदां पोहोंचावयाचे आहेच. पण जितके लवकर तें स्थान गांठता येईल तितके चांगले. कालाचेंहि बंधन असल्यामुळे विशिष्ट कालांत मोक्षप्राप्तीचे प्रयत्नहि होणे शक्य नसेल; पण जन्म-मरण शक्य तितके कमी करणे केव्हाह अशक्य नाही. शक्य तितके कमी भव करण्यांतच मुख आहे. जेवढे भव होतील तेवढ्यामधूनहि सम्यक्त्वापासून आत्मा कधीहि ढळणार नाही असा प्रयत्न जीवाने आदरवा म्हणजे त्यांतल्या त्यांत अधिक मुखी व कल्याणप्रद जीवन होईल. महावीर स्वामीचे तीर्थकरत्व सर्व जीवांना प्राप्त होणे शक्य नाही, पण सिद्ध पदवी सर्व जीवांना प्राप्त होणारी आहे म्हणून महावीरस्वामींचा आदर्श नेहमी डोळ्यांपुढे ठेवणे जरूर आहे. महावार तीर्थकरांचे चरित्र व त्यांचा उपदेश भव्यजीवांना मोक्षाची वाट दाखविण्यास खास उपयोगी पडेल.
( १११)