________________
महावीरचरित्र
भरले आहे हे ह्मणे भ्रामक होय. तो पुरुष पुत्रापेक्षेनें बाप असेल; पण पित्रापेक्षेनें पुत्रहि आहे हेंच स्याद्वादांतील मर्म आहे. हॅ मर्म न ओळखल्या· मुळेच इतर मतें एकांतिक बनली आहेत; पण जैनमत सार्वेगिक व परिपूर्ण आहे. महावीर तोर्थकरांच्या उपदेशाचें सार थोडक्यांत खालीलप्रमाणे आहे. ( 9 ) हें विश्व अनाद्यनंत व स्वयंभू आहे. त्यांत जीव, अजीव, धर्म, अधर्म, आकाश व काल ही सहा द्रव्ये अनाद्यनंत व स्वयंभूच आहेत. जीव भिन्न च अनंत आहेत. ( २ ) स्वभावतः हीं द्रव्ये नित्य असली तरी पर्यायांतरामुळे व त्या दृष्टीनें अनित्यहि आहेत. ( ३ ) संसारी जीव अनादिकालापासून जड व पापपुण्यमय कर्मपुङ्गलांच्या संयोगामुळे अशुद्ध आहे. ( ४ ) कषायजन्य मनवचन काययोगामुळे जीवाला कर्मबंध होतो. व त्याच तीन शुद्ध योगामुळे तो कर्मबंधनांतून विमुक्त हि होतो. ( ५ ) कर्माचा फलदाता कोणी ईश्वर नसून पापपुण्यानुसार जीव सद्भाव व असद्भाव देऊन सुखदुःख भोगावयास लावतो. (६, मुक्त जीवहि संसारी जीवाप्रमाणें अनंत व भिन्न आहेत. ते फिरून संसारी होत नाहीत. (७) मुक्तात्मे तीर्थकर व सिद्धांची उपासना केल्याने ते प्रसन्न होऊन मुक्ति देत नाहीत; पण उपासकाचे भाव या भक्तीमुळे शुद्ध होऊन त्याला मोक्षफल मिळते. ( ८ ) क्रोध, मान, माया व लोभ या चार कषायमुळे कर्मबंध होतो. कषायवृत्ति सोडून वीतरागमय आत्मा समाधिस्थ केल्याने कर्मबंधाचा नाश होतो. म्हणून मुक्तीचे साधन जीवाचेच हाती आहे. ( ९ ) अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे परम धर्म होत. निथमुनि हे धर्म पूर्णपणे पाळतात. गृहस्थीजनानी आपापल्या कुवतीनुसार पाळावेत. (१०) मुनि व गृहस्थाची नित्य षट्कर्मे अनुक्रमें खालीलप्रमाणे आहेत. सामायिक, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, मुक्तात्मस्तुति, मुक्तात्मवंदन व कार्योत्सर्ग, आणि सद्देवपूजा, सद्गुरुभक्ति, सच्छास्त्रपठण, संयम, तप व दान. ( ११ ) मुनि निर्ग्रथ असतात. ते आरंभ व परिग्रहाचा त्याग केलेले असतात. ( १२ ) गृहस्थाचे खालील आठ मूलगुण आहेत. रेचा त्याग, आणि पंचाणुव्रतांचे पालन. ( १३ ) जीव, आलव, संवर, बंध, निर्जरा व मोक्ष हे नऊ पदार्थ अनाद्यनंत आहेत. (१४) ईश्वर म्हणजे स्वयंभू, अकलंक, वीतराग, उपाधिरहित व चैतन्यमय शुद्धात्मा होय. असे ईश्वर अनंत आहेत. (१५) आत्मतत्व व जडत्तत्त्व ही अगर्दी मिल ( १०८ )
तप, मांस व मदिअजीव, पुण्य, पाप,