________________
महावीर निर्वाणकल्याणक.
आहेत. त्यांचा संयोग होतो; पण ती कधीहि एक होणार नाहीत. (१६) सम्यक्दर्शन, सम्यकूज्ञान व सम्यकूचरित्र या रत्नत्रयांच्या एकसमयावच्छेदे उपयोग करूनच संसारी जीव मुक्तात्मा हाऊ शकतो. ( १७) भव्यात्म्याशिवाय इतर जीवांना मुक्ति मिळत नाही व मानुषभवाशिवाय इतर भवांतून जीव मुक्तीला जात नाही. याशिवाय इतरहि अनेक विशेष उपदेश आहेत; पण आत्मोन्नतीच्या बाबतीत पूर्णश्रद्धा, जीवाजीवांचे पूर्ण ज्ञान व स्वावलंबनाचे जोरावर अजीवाचे संयोगापासून सुटण्याचे प्रयत्न या तीन गोष्टी संसारी जीवान. केल्या पाहिजेत इंच महावीर तर्थिकरांच्या उपदेशाचे मुख्य सार आहे. या बाबतीत अश्रद्धा नुकसानकारक ठरते. अपुरे ज्ञान घातुक होते व परावलंबन विपरीत परिणाम करते. स्वच्छंद हा केव्हाहि वाईटच. पण सम्यक् आलंबन घेणेहि महत्त्वाचे आहे. स्वच्छंद व वाईट आलंबन ही दोन्ही त्याज्यच होत.
पावापुरचिा इस्तिपाल राजा तीर्थकर संघाची सेवा करण्याची आशा फार दिवसापासून करीत होता व शेवटी ती एकदा फळीभूत झाली. मनोहर नांवाच्या बागेत तीर्थकरसंघ उतरला होता. नावाप्रमाणेच तो बगिचाहि अतिशय मनोहर होता. पावापुरीच्या लोकांनी गुड्यातोरणे उभारून, सडासंमार्जन करून व रांगाव्या घालन पुरी शृंगारली होती. सर्व नरनारी व बाल उच्च वस्त्रे परिधान करून व अलंकार धारण करून भगवानाला वंदन करण्यास गेले. मनोहर बगीच्यातील एका तलावांत लहानशी बाग बनविण्यात आली होती. त्यांत भगवान महावीर बसले होते. निर्वाणकाल समाप आल्यामुळे समवसरण आतां विघटित झाले होते. तीर्थकराच्या तीस वर्षांच्या उपदेशाने सर्वत्र इतका समभाव पसरला होता की, सिंहगज, मृगव्याघ्र, मार्जारमूषक वगेरे प्राणीहि आपलें नसान र विसरून गेले होते. मग मनुष्यप्राण्यावर भगवानाच्या उपदेशाचा परिणाम झाला असल्यास त्यांत काय नवल : असा समताभाव सर्वत्र उत्पन्न झाल्यामुळे मुखशांति नांदत होती. सर्व वनस्पतीहि प्रफुल्लित दिसत होत्या. समवसरण विघटित झालेले पाहून तीर्थकराचा निर्वाणकाल जवळ आला असें इंद्रादि देवानी जाणले. कार्तिक २० १४ चे रात्री चंद्र स्वाति नक्षत्राला असताना सन्मति भगवानानी षष्टोपवास धारण करून योगनिरोध करून, कायोत्सर्ग करून, सर्व कर्माचा नाश केल्यावर महावीर तीर्थकराचा आत्मा मोक्षशिलेला गेला. लगेच इंद्रादि देवानी तीर्थकर शरीराला निर्माणकल्याणक केले. ज्या
(१०९)