________________
महावीर निर्वाणकल्याणक पाचा जेव्हा विचार करतो तेव्हा द्रव्यार्थिकनयाने विचार करतो. आत्मा जेव्हां त्याच्या पापपुण्यानुसार देव, मनुष्य, तिर्यच व नरक गीत असतो तेव्हां पर्यायार्थिक नयाने त्याला देव, मनुष्य, तियेच किंवा नारक म्हणतां येईल; पण द्रव्यार्थिकनयाने त्याला आत्माच म्हणावे लागेल. एखाद्या वस्तूला एकाच वेळी ती अमुक वस्तू आहे असे जसें तुम्ही म्हणू शकाल, तसे ती अमुक वस्तु नाही असेंहि म्हणूं शकाल. याप्रमाणे सप्तभंगीनयाने किंवा सात प्रकाराने वस्तूचे स्वरूप सांगण्याची पद्धत आहे. घटाची उत्पत्ति म्हणजे पूर्वी नसलेल्या पदार्थाची उत्पत्ति असे पर्यायार्थिक नयाने म्हणतां येईल. पण पूर्वी जिचे अस्तित्वहि नव्हते अशा वस्तूपासून काही घट बनला नाही. नृत्तिका पूर्वी होतीच म्हणून द्रव्यार्थिकनयाने घटाला मृत्तिका म्हणता येईल. या रीतीने एका अपेक्षेने तुम्ही पदार्थाचे अस्तित्व कयूल कराल. दुसऱ्या अपेक्षेने अस्तित्व नाकारू शकाल; पण निरनिराळ्या वेळींच एकाद्या पदार्थांचे अस्तित्व व नास्तित्व दोन्ही तुम्ही दाखवू शकाल. एकाच वेळी मात्र एखाद्या पदार्थाचे अस्तित्व व नास्तित्व एकाच अपेक्षेने सांगणे अशक्य आहे. याचप्रमाणे एका अपेक्षेने एखाद्या वस्तूचे अस्तित्व सांगणे अशक्य होईल. नास्तित्व सांगणे अशक्य होईल, व अस्तित्व नास्तित्व दोन्ही सांगणे अशक्य होईल. म्हणून अनेकांतवादाचा किंवा सप्तभंगी न्यायाचा निष्कर्ष हा की, एखादी वस्तु सर्व दृष्टीने, सर्व काळी व सर्व प्रकारे असते, असे मानतां येणार नाही. एखादी वस्तू एका ठिकाणी असेल तर दुसऱ्या ठिकाणी नसेल. एका वेळी असेल, तर दुस-या वेळी नसेल; एखाद्या रूपांत असेल व दुस-या स्वरूपाने नसेल. यावरून कोणत्याहि वस्तूच्या स्वरूपाचा निश्चय करता येणार नाहीं असें जे काही विद्वान म्हणतात ते मात्र खोटें आहे. उलट या उपायामुळेच खरा व शुद्ध निश्चय होईल. प्रत्येक निर्णय सापेक्षपणाने करावा. हाच सप्तभंगीन्यायाचा उद्देश आहे. शंकराचार्यानी (नैकस्मिन्संभवात' म्हणजे एकाच वेळी अस्तित्व व नास्तित्व कसे सांगता येईल, असा आक्षेप स्याद्वादाचे बाबतीत आणला आहे. पण तो भ्रामक आहे हे डॉ. भांडारकरांनीहि म्हटलेच आहे. उलट शंकराचार्याचा अद्वैत सिद्धान्तच भ्रामक आहे ही गोष्ट अबालवृद्धांच्या परिचयाची आहे. एखाद्या पुरुषाला तो सर्वांचा सर्व काळी बाप आहे हे म्हणणे जसें भ्रामक, तसेच एक ब्रह्मच सर्वत्र, सर्वकाळी
(१०७)