________________
___ महावीरचरित्र
काढण्यासाठी म. बुद्ध जंगलांत गेले होते. असा मार्ग सांगणारा कोणी भेटल्यास त्याची सेवा करीत आपण राहूं व तो सांगेल ती खडतर तपश्चर्या करून आपण तो मार्ग प्राप्त करून घेऊ अशी म. बुद्धाला उमेद होती. खरोखर शुद्धोदन राजाने जर भलतेच नियंत्रण बुद्धावर घातले नसते तर ज्या जैनधर्मात त्यांचा जन्म झाला त्याच धर्माचे साधु योग्य वेळी त्यांना भेटले असते व योग्य मार्ग त्यांना मिळाला असता; पण तसे होण्याइतके त्यांचे पुण्यकर्म बलवत्तर नव्हते असेंच म्हणावे लागते व म्हणूनच ते भेटेल त्या साधूच्या नादी लागत गेले व शेवटी जैनसाधु भेटला तरी त्याने सांगितलेल्या मार्गावर त्यांची श्रद्धा शेवटपर्यंत टिकली नाही व तो मार्ग अर्धवटच सोडून स्वकपोलकल्पित मार्गाने ते गेले व जी काही प्राप्ति झाली त्यावरच संतोष मानून तोच मध्यम मार्ग म्हणून उपदेशावयास फिरून म. बुद्ध लोकवस्तीत भाले. असो. पूर्वकर्म जसें होते तसे झाले. रथांतन जंगलांत उतरल्यावर होते ते कपडे त्यांनी फेंकून दिले व मार्ग दाखविणाऱ्या साधूच्या शोधांत निघाले. 'एक सांख्यमताच्या साधु जवळपास रहात आहे असे त्यांना कळल्यावर ते त्याच्याजवळ गेले. या आरादकालम साधनें आपला मार्ग बुद्धाला सांगितला, पण आरादने जे काही सांगितले आहे त्याने मला हवा असलेला मार्ग मिळून माझ्या मनाची शांति होईल असे मला वाटत नाही असे म्हणून म० बुद्ध तेथून निघाले. पुढे ते उद्रराम नांवाच्या एका ऋषीच्या तपोवनांत गेले; पण तेथेहि त्यांचे समाधान झाले नाही. सर्व तपोवने थुडून अनेक मतांच्या साधूचा त्यांनी समागम केला, पण त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. हिंडतां हिंडतां ते गयेजवळच्या 'क्याची' नामक तापसवनांत आले. तेथे त्यांना पाच निग्रंथि साधु दिसले. त्यांचे म्हणणे बुद्धानां प्रमाण वाटले व त्यांनी सांगितलेली साधना ते करूं लागले. साधना करूं लागल्यावर थोडा अनुभवहि त्यांना आला. तेव्हां त्या पलाशग्राम किंवा वनग्राम नांवाच्या तापसवनांत राहून साधना पुरी करण्याचा त्यांनी निश्चय केला. ज्या मुनिजवळ त्यांनी दीक्षा घेतली त्याचे नांव पिहिताश्रव. फल ज्याप्रमाणे अचित होऊ शकते तसें मांसहि होऊ शकतें व कषायवस्त्र असले तरी दिगंबरत्वास बाध येत नाही असा मतभेद झाल्यामुळे पार्श्वनाथ तीर्थकरांच्या परंपरेतील संघातून पिहिताश्रव फुटून निघाले होते. केशलोच, ध्यान, उपवास वगैरे इतर सर्व क्रिया ते पाळीत असत. म० बुद्धांनी
(९२)