________________
भगवान महावीर व महात्मा बुद्ध.
उत्पन्न होण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून त्यानें सर्व सुखसाधनसंपन्न असा खास महाल तयार करून त्यांत सिद्धार्थाला ठेवलें. इतर तरुण राजकुमारांबरोबर ते अनेक तऱ्हेची क्रीडा करीत. एकदां बुद्ध आपला चुलतभाऊ देवदत्त याच्यासह धनुर्विद्या शिकत असतां, एक बाण एक पक्ष्याला लागला व तो तडफडत झाडावरून खालीं पडला. ते दृश्य पाहून बुद्धाचें हृदय अतिशय कळवळले. पुढे शुद्धोदन राजाने लवकरच पुत्राचा विवाह करून टाकला. अशा हेतूनें कीं, तो मायापाशांत इतक गुरफटला जावा की त्याला संन्यास घेण्याची बुद्धीच होऊ नये. यशोदा नांवाच्या राजकुमारीपासून बुद्धाला रहुल नांवाचा. मुलगाहि झाला; पण एकदां पूर्वस्मरण होऊन बुद्ध महाल सोडून वनांत निघून गेले. एकदां ते सद्दल करण्यास रथांत बसून गेले असतां, एक शेतकरी कडक उन्हांत शेतांत रावतांना त्यांना दिसला. पोटासाठी व देहपालनासाठी इतके कष्ट करावे लागतात ही गोष्ट बुद्धाला असह्य झाली. पुढे एक रोगी त्यांना दिसला. त्याचे कष्ट पाहूनहि युद्धाचे मन कळवळले. नंतर एक अगदी म्हातारा मनुष्य त्यांच्या नजरेस पडला. कर्मधर्मसंयोगानं त्याच वेळी एक प्रेतयात्राहि त्यांच्या जवळून गेली. याप्रमाणे ही चार पाहून बुद्धाचे मनांत खळबळ उडाली. आपणालाहि या स्थितीतून जावे लागणार आहे याची त्याला कल्पना आली व अशी दुःस्थिति पुन्हा न येईल असा प्रयत्न करण्याचा युद्धाने निश्चय केला. घरी परत आल्यावर त्याने संसार सोडून वनांत जाण्याचा निश्चय केला. पण वडील व पत्नीला ही गोष्ट कळून उपयोगी नाहीं हें जाणून मध्यरात्री जाण्याचा बुद्धानें, निश्चय केला. मध्यरात्री मुलगा व पत्नी गाढ निद्रावश झालेली पाहून, दोघांचें सुबन घेऊन लवकर जंगल गाठता यावे म्हणून रथ मागविला व त्यात बसून तो जंगलाच्या मार्गानें चालला. पहाट होईतोपर्यंत रथ जोराने हाकण्यांत आला व दाट जंगलांत पोहोचल्यावर बुद्धाने सारथ्याला रथ परत घेऊन जाण्यास सांगि तलें. सारथ्याला त्याचे आश्चर्य वाटले. राजाला व छोट्या राणीला जाऊन काय सांगू म्हणून तो विचारू लागला. पण रथ घेऊन परत महालाकडे जाण्याची तुला माझी आज्ञा आहे यापलीकडे बुद्ध कांहींच सांगेना. तेव्हां निरुपायानें सारथी रथ घेऊन परत गेला. यशोदा राणीनें व शुद्धोदन राजानें फार शोक केला.. बरीच वनें धुंडाळली; पण त्याला बुद्धाचा कांहीं शोध लागला नाहीं.
जन्म, कष्ट, रोग, जरा व मरण या दुःखांतून कायमचे सुटण्याचा मार्ग शोधून ( ९१ )