________________
महावीरचरित्र
कांहींच नवल नाही. एक ठिकाणी खुद्द बुद्धानेंच म्हटले आहे की, 'दुःख वाईट आहे, व त्यापासून दूर राहिले पाहिजे. अतिरेकांत दुःख आहे. तपश्चरण हा एक प्रकारचा आतरक आहे व दुःखकारक आहे. तपश्चरणाचे कष्ट सहन करून कांही प्रत्यक्ष लाभहि होत नाही. म्हणून तो निरर्थक आहे' चार्वाक ऐहिक मुखासाठी ऐहिक भोगोपभोग भोगण्याचाच मार्ग सांगत होते व म. बुद्ध त्याच हेतूने पण मार्ग मात्र दुसरा म्हणजे संयमादिकाचा सांगत होते एवढाच फरक; पण चार्वाकाप्रमाणेच या जन्मानंतरच्या जीवनाबद्दल म. बुद्धांनी शिष्यांपुढे तरी चर्चा केलेली नाही; मग ते स्वतः त्याबद्दल काहीहि समजलेले असोत. या जीवनोत्तर स्थितीबद्दल त्यांनी काही साधने सांगितलेली नाही व स्वतःहि मध्येच सोडून दिली. म्हणून ते केवलज्ञानी नव्हते हे उघड आहे. उच्च परमार्थाच्या दृष्टीने त्यांच्या उपदेशास विशेष किंमत नसून लौकिक पण शुद्ध सुखाच्या दृष्टीने महत्व आहे; उलट भगवान महावीरांच्या उपदेशास मुख्यतः या जीवनोत्तर जीवनाच्याच दृष्टीने महत्त्व आहे. इहलोकीचे खरे मुख त्यांत अंगभूत असू शकेल; पण मुख्य विचार शाश्वत सुखाचाच आहे. खुद्द म. बुद्धानांहि महावीर तीर्थकराच्या माहात्म्याची कल्पना पूर्णपणे होती असे त्यांनी वेळोवेळी काढलेल्या उद्गारावरून दिसते. खरें सर्वज्ञ किती आहेत म्हणून एकाने त्यांना विचारले असतां, संसारी लोकांच्या कल्पनेंतहि न येणारी ती गोष्ट आहे असे त्यांनी उत्तर दिले. मज्झिमनीकाय, अंगुतरनिकाय, न्यायबिन्दु वगैरे अनेक बौद्धग्रंथांतून भगवान महावीरांच्या सर्वज्ञतेची स्तुति करण्यांत आली आहे. मज्झिमनिकायांत एक वचन खालीलप्रमाणे आहे. 'भिखूनो, असे काही संन्यासी आहेत की, जे म्हणतात प्राणी जें सुखदुःख भोगतात किंवा समभाव राखू शकतात तो त्यांच्या पूर्वकर्माप्रमाणे होय. निग्रंथ म्हणतात की, आमचे गुरु नातपुत्र सर्वज्ञ आहेत. आपल्या विशेषज्ञानाने त्यांनी असा उपदेश केला आहे की, उग्र तपश्चर्या करून तुम्ही पूर्वकर्माचा क्षय करा व नवीं वाईट कर्मे करूं नका म्हणजे सर्व दुःखाचा नाश होईल. भिक्षंनो, मी या विचाराशी सहमत आहे तथापि त्यांनी तपश्चर्येचा निषेध केला आहे. याचे कारण ज्यांना उच्च ध्येय नाही व तपश्चर्येचे कष्ट सहन होणार नाहीत अशा जीवांना निरर्थक होणाऱ्या त्रासाची त्यांना कीव आली हेच होय. भगवान् महावीरांनी बारा वर्षे तपश्चर्या करून केवलज्ञान प्राप्त झाल्यावर
(९६)