________________
इंद्रियविषयाच्या आधीन झाला, अर्थ, अनर्थाचा रहाडा केला, आत्मस्वरूपाचे भान हरपला, ‘णत्थि कालस्स णागमो' विसरला.
पौष्टिक मालमसाले खाऊन धष्टपुष्ट बनला इंद्रियांच्या तालावर वाटेल तसा नाचला, प्रभु-भजनात कधी नाही रमला, ‘णत्थि कालस्स णागमो' विसरला.
आता मात्र
७)
दैव फिरले, हातातले आलेले निसटून गेले, देवाने दिले दैवाने नेले म्हणून शोक केले, ज्यांच्यासाठी धडपड केली त्यांनी मात्र तोंड फिरविले, तेव्हा आठवले ‘णत्थि कालस्स णागमो'.
आधिव्याधींनी ठाण मांडले, धष्टपुष्ट इंद्रियांचे बल घटले, असहाय्य स्थितीत स्वकीय दूर झाले, तेव्हा आठवले ‘णत्थि कालस्स णागमो'.
७२