________________
(४) णत्थि कालस्स णागमो
- शकुंतला चोरडिया
१)
आचारांगाचे दार उघडले, प्रतिपादित तत्त्वांचे चिंतन केले, 'णत्थि कालस्स णागमो' एवढे भिडले, सतत जागृत रहाण्याचे धडे गिरविले.
काळाचा भरवसा नाही, तरुण, म्हातारा पहाणार नाही, जसा जेथे असेल तसा उचलून घेईल, होत्याचे नव्हते करून जाईल.
तरीही
३) पूजा, सन्मान, सत्कार, प्रतिष्ठचा चटका लागला,
वारेमाप स्थावर जीवांचा घात केला, पण सर्वांच्या जयजयकाराने खुश झाला, ‘णत्थि कालस्स णागमो' विसरला.
स्वजन परिवाराच्या मोहाने वेडा झाला, रात्रंदिवस मेहनत करून पैसा मिळविला, मानमरातब ऐश्वर्याने सुखावला, 'णत्थि कालस्स णागमो' विसरला.