________________
'उपधान-श्रुताचं' स्थान, आमच्या लेखी ठरलं आगळं ‘जसे बोलले तसे वागले' पुरेपूर ध्यानी आलं तुझ्या शिष्यवरांनी लिहिली तुझ्या तपस्येची कहाणी तुझ्या उपदेशाची अखेर यापेक्षा कोणती चांगली ठरती
शस्त्रपरिजेतून उमगो आजूबाजूचे तीव्र भान 'जितं मया'चा अहं दूर करो लोकविजयाचे तुझे गान शीतोष्णीयामधून वाढो थोडी तरी सहनशक्ती सम्यक्त्वातून साधो आम्हा मध्यस्थतेची थोडी युक्ती तुच्छ काय, सार काय, लोकसारातून घ्यावा बोध काय झटकणं जरूर आहे, याचा धुतवादातून शोध मरणं कसं स्वीकारावं ? ठाऊक असू दे विमोक्षातून उपधानातील तुझा आदर्श कधी न जावो स्मरणातून सार ध्यानी ठेवू आणि विसरून जाऊ सारं कटू नवीन-नवीन शिकण्यासाठी पुढच्या वर्षी नक्की भेटू.
६६