________________
बघता बघता उडून जाईल, इंद्रियसुखांचा तरल पारा
ऐन वेळी कुठून आणशील, त्या दुःखांशी लढण्याचं बळ फार पुढे जाण्याआधीच वेळेवरती मागे वळ
३) 'सहन करणं म्हणजे दुबळेपणा' - ठाम समज होता आमचा 'शीतोष्णीयांच्या ' रूपानं दिलास नवा वसा कायमचा
S
हसून म्हणालास, ‘जरूर भरा चाळणी पाण्यानं काठोकाठ ' बघा धावून इच्छांमागे, दुसऱ्या हजर पाठोपाठ. विजोडांचे जोड जोडत, चालतो पुढे लावत ठिगळ संधींचं स्वरूप समजावून, नेटकं केलंस जीवन ढगळ. शीतोष्णीयांचा उपसंहार वेगळाच विचार मांडून केलास 'सत्यद्रष्ट्याला कसली उपाधी ?' रोखठोक सल्ला दिलास
४) 'सम्यक्त्वाचा' प्रासाद उभा अहिंसेच्या पायावर संयम-मार्ग नाही सोपा, धैर्याची ती कसोटी खडतर लोकैषणा सोडून दे, शरीर-मनाचे दमन कर आगापीछा ठेवू नको, बोधीचा मार्ग दुरनुचर त्याग, संन्यास नाही सोपा, या अध्ययनात बिंबवलंस आम्हाला पुरतं कळून चुकलं, हे तर कुशलांचं दर्शन. पहिलं म्हणजे आचारांगच, सर्व आगमांचं सार त्यातलं पाचवं अध्ययन, शीर्षक त्याचं 'लोकसार'. आमचं इच्छापूर्तीचं विश्व, फोलपटांनाच म्हणतो सत्त्व तुमची भूमिका, दृष्टी वेगळी, तुम्ही शोधली त्यातून तत्त्व.
६४