________________
आचारांग
काव्यकुंज
(१) आचारांग : काव्यातून
-
डॉ. नलिनी जोशी
२६ शतकं उलटून गेली, एक दशकही पुढचं सरलं आचारांगातलं विचारसंचित आजही तितकंच ताजं वाटलं
१) आत्मशोधापासूनचा प्रवास संथाऱ्यापर्यंत येऊन ठेपला तुझ्या पाउलखुणा शोधत आम्हीही थोडा करून पाहिला वाटलं होतं आचारांगात असेल सारं साधूंसाठी विसाव्याच्या छाया दिसल्या तुम्हा आम्हा सर्वांसाठी पहा- - बघा- विचार करा तळमळून तू सांगितलंस
डोळे मिटून जगणाऱ्यांसाठी झणझणीत शब्दात अंजन घातलंस
वेदनाग्रस्त इंद्रियांना तू तुझा आवाज दिलास
आवाजातून त्यांचा आक्रोश, आमच्यापर्यंत पोहोचवलास (अन् जाणीव झाली)
जगण्यासाठी, कीर्तीसाठी, दु:खापासून सुटकेसाठी
धर्मासाठी, मोक्षासाठी किती ओझं बांधलं पाठी !
'परिज्ञे'चा खरा अर्थ, थोडा जरी समजला, उगारलेली 'शस्त्रं' आमची म्यान होतील बघता बघता
२) कोणता 'लोक' ? कसला 'विजय' ? तू विचाराला लावलंस एका क्षणावर तुझी सत्ता, कसलं करतोस नियोजन ? पिकावरच्या पाखरांसारखा, गोतावळा हा तुझा सारा
६३