________________
लाकडी पात्रे कल्पतात. प्लॅस्टिक इ. पासून बनलेल्या आकर्षक, रंगीत पात्रांची त्यांना सवय लावू नये. आगमामध्ये श्रावकांना ‘अम्मा-पिया' असे संबोधन वापरले आहे. आपण आई-वडील असू तर साधु-संतांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या आड येईल अशी कोणतीही गोष्ट आपण करू नये. आपली ही जबाबदारी आहे की त्यांच्या आचरणातील काही चूक आपल्या लक्षात आली तर नम्रतापूर्वक ती त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी.
साधू-आचाराचे नियम आपल्याला नीट माहीत असतील तरच आपण साधूंच्या संयम-पालनाला सहायक अशा गोष्टी करू शकू.
म्हणूनच प्रत्येक जैन व्यक्तीला आपण आचारांग शिकण्यास प्रोत्साहित
करू या.