________________
(१६) साधु-आचारास श्रावक कसा पूरक ठरेल ?
- शोभा लोढा आचारांगात भ. महावीरांनी सतत आजूबाजूचे निरीक्षण करायचा सल्ला दिला आहे. आचारांगातील षट्जीवनिकायांच्या उपदेशाचे नीट मनन केले तरच आपण जमीन, पाणी, ऊर्जा, वायू व वनस्पतींना नीट जपू शकू. सचित्तअचित्ताचे नीट ज्ञान झाले की साधु-साध्वींच्या आहारपाण्याची योग्य व्यवस्था करता येईल.
साधुसंत थांबण्याच्या जागेची आपण सोय करीत असू तर वर्षभरच ती जागा आपल्याला झाडून-पुसून स्वच्छ ठेवली पाहिजे. विहार करताना त्यांना चांगली व जवळची वाट दाखविली पाहिजे. सोबत केली पाहिजे. आडमार्गाने जाण्यात जे धोके आहेत ते यामुळे टळू शकतील. भ. महावीर खरोखरच द्रष्टे होते. वाहनांच्या अति-वापरामुळे होणारे धोके आणि प्रदूषण जणू त्यांना कळले होते. म्हणूनच त्यांनी साधूंना पायी विहार सांगितला.
आचारांगाने साधूंच्या भाषिक व्यवहारासाठी घालून दिलेले नियम आपण वाचले. त्या नियमांचे यथाशक्ती पालन श्रावकासही फायदेशीर ठरेल. साधूंची भाषैषणा जाणून श्रावकाने ठरवावे की आपण त्यांच्याशी जादा जवळीक ठेवू नये. कुटुंबकथा करू नयेत.त्यांच्याकडून सांसारिक गोष्टीतले सल्ले-मार्गदर्शन घेऊ नये. साधु-संत हे समाजाचे धार्मिक व आध्यात्मिक सल्लागार आहेत. कौटुंबिक, भावनिक समुपदेशनाची अपेक्षा ठेवू नये.
आचारांगातील वस्त्रैषणा जाणून त्यांना जादा व चांगली वस्त्रे वापरणे व साठवणे याच्या मोहात पाडू नये. तीच गोष्ट पात्रैषणेची. त्यांना अत्यंत साधी,