________________
जीवांची हत्या करतो, पाण्यात टाकून त्यातील जीवांची हत्या करतो. शनिवारी जागोजागी लिंबू-मिरची लावणे, फोटोंना रोज नवे हार घालणे, काही ठिकाणी तर दिवसातून ४-५ वेळेस देवांचे हार बदलणे, देवाला तेल वाहणे इ. यापेक्षा तो पैसा साठवून एखाद्या गरजूला शिक्षण, औषध, भुकेलेल्याला जेवण देता येईल. राजकीय नेत्यांना एवढे मोठे हार घातले जातात. पैसा वाया जातो व फुलांची हत्या होते.
__'सूरज की गरमी से जलते हुए तन को मिल जाए तरवर की छाया', हे गाणे ऐकल्यावर वाटते की - ‘झाडांची सावली मिळायला झाडे तर शिल्लक हवीत ना!' रस्त्यांचे रुंदीकरण, कागद बनवणे, चंदन तस्करी, फर्निचर इ. अनेक कारणांनी वृक्षतोड होते. दसऱ्याला तर आपट्याची पाने खूप तोडली जातात व बरीच वायाही जातात. दसरा, दिवाळी, पाडवा इ. अनेक उत्सवात कितीतरी फुले तोडली जातात व जास्त झाली म्हणून रस्त्यावर फेकली जातात. काही वर्षांनंतर आपल्या पुढच्या पिढीला ही झाडे इंटरनेटवर पाहायला मिळतील. एके ठिकाणी वाचले – ‘पडता पडता झाड म्हणाले आमची कोठेही शाखा नाही', अन् मन सुन्न झाले.
उपसंहार :
सकल जैन समाजाने एकत्र येऊन असे ठरवावे की - यापुढे लग्न, इतर समारंभ, उत्सव इ. हिरवळीवर करू नये. फुलांचे डेकोरेशन करू नये. पुष्पगुच्छ देऊ नयेत. या सर्व जुन्या-नव्या प्रथा द्रव्य-क्षेत्र-काल-भावाचा विचार करून बंद कराव्यात. निदान भ. महावीरांचे अनुयायी आहोत तर एक चांगले पाऊल अहिंसेकडे उचलू या. आचारांग जीवनात उतरवू या.
८
.