________________
(१५) आचारांगात वनस्पती आणि पर्यावरण
- साधना देसडला 'मुठा नदीचे पाणी पिण्याजोगे, वापरण्याजोगे नाही', हे वाचले, अन् मनात विचार आला, 'याला कारणीभूत सर्व मानव समाज आहे.' निर्माल्य, सांडपाणी, कागद-कचरा, प्लॅस्टिक इ. अनेक गोष्टी रोजच नदीत टाकल्या जातात. वनस्पतिकाय, जलकाय सर्वांची हत्या होते.
भ. महावीरांनी २६०० वर्षांपूर्वी वनस्पतींची तुलना सजीवांबरोबर केली. पृथ्वीकाय, अप्काय इ. षट्जीवनिकाय हे सर्व सजीव एकेंद्रिय जीव आहेत. मानव शरीरावर जे गुण-पर्याय आपल्याला दिसतात तसेच ते वनस्पतींच्या शरीरावरही दिसतात. विज्ञानाने सुद्धा हे मान्य केले आहे. जैनदर्शन हे एकमेव असे दर्शन आहे ज्याने या सर्वांबद्दल आस्था दर्शविली आहे, त्यांचा बारकाईने विचारही केला आहे.
'जो एगं जाणइ से सव्वं जाणइ' - जो एका आत्म्याला जाणतो, तो सगळे जाणतो. हेच दुसऱ्या शब्दात म्हणायचे झाले तर, 'जो एका षट्जीवनिकायाला जाणून वाचवेल, त्याकडून बाकीच्या जीवांचे आपोआपच रक्षण होईल.'
सध्याच्या पर्यावरण असंतुलनाला जर आळा बसवायचा असेल तर सगळीकडे 'झाडे लावा, झाडे वाचवा', असे नुसतेच लिहिण्यापेक्षा काहीतरी कृती करायला हवी. द्रव्य-क्षेत्र-काल-भाव यानुसार सर्व काही बदलत आहे. पूर्वापार चालत आलेल्या कितीतरी चालीरिती आपण आपल्या व इतरांच्या सोयीसाठी बदलत आहोत. तर मग देवांची पूजा करण्याची पद्धत का बदलू नये ? पाने, फुले, तांदूळ, शेंगदाणे इ. वाहण्यानेच का देव प्रसन्न होतो ? आपण हे सर्व तोडून
४९