________________
प्रस्थ नाही. जी भिक्षा मिळेल ती सामान्यतः ग्रहण करतात. विहारासाठी व धर्मप्रसारासाठी वाहन वापरण्याची मुभा आहे.
जैन धर्मात अहिंसा - अनेकान्त व कर्मसिद्धांतास प्राधान्य आहे. बौद्ध धर्मात मैत्री, करुणा, स्वावलंबन, सेवा व ध्यान यांना महत्त्व आहे. कडक आचारपद्धती व सूक्ष्म तत्त्वज्ञान यामुळे जैन धर्माचा प्रचार कमी झाला. मध्यम आचार आणि सोपे तत्त्वज्ञान यामुळे बौद्ध धर्म जगभर पसरला.
आज घडीला भारतात पाळला जाणारा जैन धर्म आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास, आज घडीला भारतात अस्तित्वात असलेल्या बौद्ध धर्मापेक्षा निश्चितच मूलगामी, व्यापक व समाजनिष्ठ आहे. साधुवर्ग व श्रावकवर्गाची घट्ट वीण हे त्याचे कारण आहे.
४८