________________
महावीरांनी 'सत्'चे स्वरूप उत्पाद-व्यय-ध्रौव्य युक्त मानले. बुद्धांनी क्षणिकतेवर अधिक भर दिला. दु:खमुक्तीचे उपाय सांगितले. महावीरांनी पूर्वकर्मांच्या संपूर्ण निर्जरेने निर्वाणप्राप्ती सांगितली. बुद्धांचा मार्ग मध्यम-मार्ग होता. त्यांनी स्वतः कष्ट करण्यावर, करुणेवर भर दिला. पाप न करणे, चांगल्या संगतीत राहणे, चित्त शुद्ध ठेवणे - यावर म्हणजे शीलपालनाला महत्त्व दिले. आचारांगाच्या पहिल्या श्रुतस्कंधात आभ्यंतर संवेदनशीलतेला प्राधान्य दिले. बाह्य आचाराचे प्रामुख्याने निरूपण दुसऱ्या श्रुतस्कंधात केले. बौद्धांच्या ‘विनयपिटका'त भिक्षूभिक्षुणींच्या आचार-व्यवहारांची नियमावली दिली आहे.
महावीरांनी तपस्येचे १२ प्रकार सांगून शरीर कृश करण्यावर भर दिला तर तथागतांनी कडक तपाला व ओढवून घेतलेल्या शारीरिक क्लेशांना कडवा विरोध केला. तथागत म्हणतात, “तपाने शरीरास पीडा होते. बाकी काही साध्य होत नाही, प्रथम स्वतःस सुरक्षित ठेवा.'
दोघांनीही ब्रह्मचर्य-व्रतास महत्त्व दिले. महावीरांच्या संघात पूर्वपरंपरेनुसार स्त्री-दीक्षा दिल्या जात होत्या.
___ श्वेतांबर मान्यतेनुसार पुरुषच काय पण स्त्रिया व नपुंसकही 'सिद्धपद' प्राप्त करू शकतात. बुद्धांचा आरंभी स्त्री-दीक्षेस विरोध होता. आनंद व माता गौतमी यांच्या आग्रहास्तव त्यांनी स्त्री-दीक्षेस अनुमती दिली. जैन धर्मानुसार साधूंसाठी पाच व्रते महत्त्वाची तर बुद्धांनी दहा नियमांचे पालन आवश्यक मानले. जैनात जसे ‘पौषधव्रत' तसे बौद्धांमध्ये 'उपोसथव्रत' आहे.
जैन श्रमणांसाठी आहार, वस्त्र, पात्र, स्थान, वस्तू - सर्व काही ‘प्राशुक' व ‘एषणीय' असणे महत्त्वाचे आहे. पायी विहाराचे कडक नियम आजही पाळले जातात. बौद्ध धर्मात मठ-विहार बांधून राहण्याची मुभा आहे. आहार-एषणेचे
४७