________________
होते. साधनाकाळात दुष्टजनांकडून होणारे उपसर्ग, संग्रामी अग्रभागी राहून शत्रुपीडा सहन करणाऱ्या हत्तीप्रमाणे तो सहन करतो. परिषह सहन करताना पर्वताप्रमाणे अकंप राहतो. दुष्कर अशा पंचमहाव्रतांचे पालन करून सापाने आपली कात टाकावी त्याप्रमाणे इहलोक - परलोक संबंधीची आसक्ती सहज सोडतो. तपतेजाने दाही दिशा आलोकित करून अज्ञान तिमिर दूर करतो. पुरुषार्थाने कर्ममलाचा नाश करून धैर्याने दुष्कर असा भवसागर पार करतो. क्षमादि दशविध धर्माने युक्त अशा मुनींचे तप, बुद्धि, यश वृद्धिंगत होते, तो कर्माचा 'अंतकृद्' होतो, मुक्त होतो.
यावरून
प्रथम अध्ययनात 'मी कोण ? कोठून आलो ? कोठे जावयाचे?' ही जिज्ञासा, त्यानंतरचे विवेकपूर्व ज्ञान अंतिम ध्येयापर्यंत नेते. वस्तूचा यथार्थ बोध ज्ञानाने होऊन हेय - उपादेयाचे स्वरूप जाणून केलेली क्रिया साध्यापर्यंत पोहोचवते. ही अध्ययने ‘सम्यक् दर्शन - ज्ञान - चारित्राणि मोक्षमार्ग: ।' या सूत्राची उगमस्थाने आहेत. प्रथम अध्ययन गद्यरूपात तर अंतिम पद्यरूपात आहे. जैन
दर्शनाचे अंतिम उद्दिष्ट मोक्ष याद्वारे स्पष्टरूपाने समोर येते.
-
४१