________________
(११) आचारांग : उपोद्घात आणि उपसंहार
ज्योत्स्ना मुथा
भगवान् महावीरांनी स्वानुभवाने जो उपदेश दिला त्याचे सार म्हणजे आचारांग. आचारांगाची सुरूवात 'शस्त्रपरिज्ञा'ने करून 'विमुक्ति' ने उपसंहार केला आहे. 'सुयं' श्रुतज्ञानाने मंगलाचरण करून प्रथम अबोध, भवी जीवांना आत्म्याचे अस्तित्व तसेच पूर्वभव - पूर्वजन्माची जाणीव करून दिली.
शस्त्रपरिज्ञा : जीवहिंसेला कारणीभूत साधनाला ‘शस्त्र' म्हणतात. ती दोन प्रकारची. तलवार, बंदूक इ. 'द्रव्यशस्त्रे' तर हिंसा करण्यास प्रवृत्त करणारे आत्म्याचे काषायिक भाव ही 'भावशस्त्रे'. द्रव्य आणि भाव शस्त्राने जीव मनवाचा-काया योगाद्वारे, कृतकारित - अनुमोदित क्रियाद्वारे षट्कायिक जीवांची हिंसा करतो. त्यामुळे कर्मबंध होतो. जीवन निर्वाहाव्यतिरिक्त जीव वंदन, पूजा, प्रतिष्ठा, जन्म, मृत्यू, दुःखाचा प्रतिकार करण्यासाठी अज्ञानाने कर्मबंध करतो, संसारभ्रमण करत राहतो. हिंसेपासून होणारी ही भयंकरता जाणून त्यापासून निवृत्त होणे म्हणजे शस्त्रपरिज्ञा अर्थात् विवेकपूर्ण ज्ञान होय. असे ज्ञान जीवाला जातिस्मरणाने, तीर्थंकर उपदेशाने, ज्ञानी पुरुषांकडून होते. नंतर 'णाणस्स फलं विरई' या न्यायाने तो संयमी बनतो. कर्म व कर्मबंधाचे स्वरूप जाणणारा ‘परिज्ञातकर्मा मुनि’ होय. असा मुनी कसा असतो याचे वर्णन पद्यरूपाने विविध उपमांद्वारे 'विमुक्ति' अध्ययनात केले आहे.
विमुक्ति : तीर्थंकरांचा उपदेश ऐकून त्यावर नितांत श्रद्धा असलेला मुनी अनित्य संसाराचे स्वरूप जाणून घरपरिवाराचा, सावद्यक्रियांचा त्याग करतो. ‘सव्वेसिं जीवियं पियं' अशी षट्कायिक जीवांबद्दलची संवेदनशीलता जागृत
४०