________________
आठवड्यातून एक दिवस तरी स्वयंचलित वाहनांचा स्वयंस्फूर्तपणे बंद पाळले तर नक्कीच फायदा होईल.
ईर्येषणा उपसंहार :- त्याग हा जीवनाचा आधार असावा. भोग ही प्रेरणा फार प्रबळ नसावी. निसर्गाचे आपण काही देणे लागतो ह्याचे ध्यान ठेवावे. त्याचा असंयमी वापर करू नये. विज्ञानाने जीवनात सुविधा निर्माण केल्या परंतु आनंदासाठी मात्र निसर्गच हवा. चालताना, वागताना त्याचे रक्षण करणे हेच आपले कर्तव्य. शक्य तेथे पायी जावून, लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करून आपले आरोग्यही सांभाळावे. चालताना यतना आणि विवेकपूर्ण चालून अभयदानही करावे. शरीराला जास्त सुखसोयींची सवय न लावता आपल्या जीवनात आचारांगाला उतरवावे तरच आचारांग शिकण्याचा उद्देश सफल होईल. दशवैकालिकात सुद्धा सांगितले आहे की,
जयं चरे जयं चिढ़े, जयमासे जयं सए । जयं भुंजतो भासंतो, पावं कम्मं ण बंधइ ।।