________________
त्याकाळी साधूंना मर्यादित नौकाविहारास परवानगी होती. चढताना, उतरताना साधूने काळजी घ्यावी. संकटकालीन परिस्थितीत न घाबरता मनावर संयम ठेवून आत्मस्वरूपात लीन होण्यास सांगितले. आताचा आपला नौकाविहार म्हणजे जलकायिक जीवांशी खेळून त्यांचा घात करणे होय. डिझेलयुक्त बोटी चालवून जलकायिक जीवांची हिंसा करणे होय. आज ठिकठिकाणी उभे राहिलेले वॉटरपार्क ! त्यात आपण वाटेल तशा उड्या मारतो व जलकायिक जीवांना भय उत्पन्न करतो. अशा ठिकाणी आपण आपल्या मनावर संयम ठेवून आपल्या इतकेच जलकायिक जीवांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे हे भान ठेवावे.
विमानाने जग जवळ आले आहे. आता येथे असणारा माणूस दुसऱ्यातिसऱ्या तासाला परदेशात असतो. परंतु रात्री-अपरात्री विमानाचे उड्डाण म्हणजे आकाशातल्या कारभारात केलेली ढवळाढवळच होय. विहार करताना साधूंना कोणत्याही औषधी वनस्पतींविषयी इतरांना माहिती देण्यास मनाई होती. किती दूर दृष्टिकोण आहे ! आज प्रचंड कारखाने उभारण्यासाठी जंगले जाळून टाकली जात आहेत. मोठमोठ्या यंत्राने मोठ-मोठी झाडे भुईसपाट होत आहेत. शेकडो झाडे तोडून फर्निचर बनविले जात आहे. शहराजवळ बंगला हवा म्हणून चांगल्या शेतजमिनीवर सिमेंटचे जंगल उभे रहात आहे. किती ही निसर्गाची मानवाने केलेली दुर्दशा ! बागेत बनविले वूडन हाऊस, दहा पावलावर असणाऱ्या स्थानकात जायला स्कूटर, वेगाने जाणाऱ्या गाड्या याला आपण विकास म्हणतो. उलट हे वेगवान जीवन जगून आपण प्रदूषण वाढवितो.
प्रदूषणाची समस्या ही समाजाची समस्या आहे आणि व्यक्ती-व्यक्ती मिळून समाज बनतो. प्रत्येक व्यक्तीनेच जर ठरविले तर त्यावर तोडगा निघेल.
३८
-