________________
(१०) ईयैषणा आणि प्रदूषण ।
- लता बागमार
आचारांगात पाच समितींचा उल्लेख आला आहे. त्यातीलच एक ईर्येषणा म्हणजेच ईर्यासमिती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता पडल्यावर विवेक आणि यतनापूर्वक गमनागमन करणे म्हणजेच ईर्यासमिती. द्रव्य, क्षेत्र, काल, भावाने ती चार प्रकारची आहे.
समाजामध्ये सतत बदलाची प्रक्रिया चालू असते. गतिशीलता हे जिवंत समाजाचे एक लक्षण आहे. गतिमानतेचा अपरिहार्य परिणाम म्हणजेच प्रदूषण, पर्यावरणाच्या समस्या. जैनधर्मीय साधूंना सतत विहार करावा लागतो. विहार हा शब्द साधुआचरणाचा फार निकटचा म्हणून रहाण्याच्या प्रदेशाला विहार म्हणू लागले. विहार करताना साधूंना बऱ्याच नियमांचे पालन करावे लागते. रस्त्यातील प्राणीमात्रांना अभय देत, निसर्गातील वृक्षवेलींना त्रास न देता, ‘सचित्त-पणगदग' टाळून मर्यादित वेळेत यतनापूर्वक, विवेकसहित विहार करावा लागतो. हीच गोष्ट आपल्याला सुद्धा लागू पडते. माणूस हा पूर्वीपेक्षा जास्त गतिमान झाला आहे. प्रत्येकाच्या घरासमोर दोनचाकी, चारचाकी गरजेची झाली आहे. पण ह्या गरजेपायी कधीही न संपणारी गरज म्हणजे 'हवा' ह्या प्राथमिक गरजेचे आपण नुकसान केले आहे. हवेचे प्रदूषण, वायू नदीत सोडून जलप्रदूषण, सारखे हॉर्न वाजवून ध्वनिप्रदूषण आपण करतो. गरजेपुरताच गाडीचा वापर करून, एकाच ठिकाणी जायचे असेल तर एकट्याने न जाता बराबर चारचौघांना घेऊन गेलो तर चार ऐवजी एकच गाडी धावून प्रदूषणाला आळा बसेल व ट्रॅफिक जॅमची समस्या थोड्या प्रमाणात सुटेल.
३७