________________
वैशिष्ट्यपूर्ण चाली * पाय घासून, धपधप, वेडेवाकडे चालण्याने जीवहिंसा तर होतेच पण
आपली इमेजही खराब होते. पर्सनॅलिटीमधील तो एक दोष गणला जातो. गांधीजींचा ‘दांडीमार्च' आणि इंदिरा गांधींचे इम्प्रेसिव्ह चालणे मनाला भावते. राजकपूर, चार्लीचॅप्लीन, भगवान् इ. सिनेनटांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण
चालीने लोकांची मने जिंकली. दुःखी लोकांना हसविले. * संरक्षक दलातील जवान परेडमध्ये संचलन करताना रूबाबदार वाटतात.
डोक्यावर घागरी घेऊन पाण्यासाठी दाहीदिशा फिरणाऱ्या स्त्रिया मोहक
चालीबरोबरच, दाहक वास्तवावर प्रकाश टाकतात. * सत्त्वपरीक्षा म्हणून निखाऱ्यांवरून चालणाऱ्या व्यक्ती आपल्या देशात
कमी नाहीत. पोटासाठी ध्यानयोगाचा उपयोग लावून दोरीवरून डौलात चालणारी डोंबारीण अनेक गोष्टी सांगून जाते. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले' – हे सर्वश्रुतच आहे.