________________
(५) ईयॆषणा : श्रावकांची
- कांता गांधी श्रावकांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर त्यांचे जीवन अत्यंत धावपळीचे. घड्याळ्याच्या काट्यांवर दिनक्रम. वेगवान् जीवनशैलीमुळे पायी चालणे, सायकलिंग इ. ची जागा पेट्रोल, डिझेलच्या वाहनांनी घेतली. त्यामुळे अर्थातच प्रदूषण व पर्यायाने पर्यावरणाचा हास. परिणामत: जीवघेण्या आजारांना आमंत्रण. ओझोनच्या थराला छिद्र पडण्याची भीती. बहुतांशी लोकांनी जर शक्य तेथे ईर्येषणेचा अर्थात् पायी चालण्याचा वसा घेतला तर कितीतरी फायदे होतील. * जवळच्या जागी पायी जाणे. अनवाणी गेले तर तुलनेने जीवहिंसा कमी.
पायांना अॅक्युप्रेशर क्रिया मिळून आरोग्य उत्तम राहण्यास मदत. चालता-चालता प्रभूचे नामस्मरण, जप इ. केल्यास स्वार्थ-परमार्थ दोन्ही साधेल. वारकरी संप्रदाय याचे उत्तम उदाहरण. आजही पाँडेचरी, माथेरान, आय.आय.टीचा कॅम्पस इ. मध्ये वाहने जात नाहीत, ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. वास्तुशास्त्रज्ञ म्हणतात की, प्रदूषण कमी झाल्यास ताजमहालसारख्या पुरातन वास्तूंचे सौंदर्य अबाधित राहण्यास मदत होईल. सामाजिक बांधिलकी म्हणून ओळखीच्या, विश्वासातल्या लोकांना लिफ्ट द्यावी. यादी करून ग्रुपने खरेदीला जावे. आपल्या कामांबरोबरच वयोवृद्ध,
विकलांग, अंध इ. लोकांचीही कामे करावीत. त्याने प्रेमही वाढेल. * बस, रेल्वे, एस्.टी. इ.ने प्रवास केल्यास इंधन बचत होईल. अनायासेच
राष्ट्रविकासाला हातभार लागेल.
२८