________________
(४) मलमूत्रविसर्जनाची खबरदारी
- मदनबाई लोढा जैन धर्माने अतिप्राचीन काळी प्रदूषण-रक्षणासाठी केलेला विचार आचारांगाच्या दुसऱ्या श्रुतस्कंधात आलेला आहे.
मलमूत्रविसर्जन चलजीवाचा नैसर्गिक विधी आहे. तरीसुद्धा या कारणाने अधिकतर स्थावर जीवांची हिंसा होते. नकळत त्यांना पीडा, वेदना होतात. कर्मबंधास कारण होते. यासाठी साधूंनी आवश्यक नियमांचे पालन करावयाचे आहे. ते सर्व मानवजातीस उपयोगी व आवश्यकही आहे. १) विसर्जनाचे स्थान निर्जंतुक असावे. २) ते कोणी मुद्दाम बनविलेले अथवा नूतनीकरण केलेले नसावे. ३) कोणी खरेदी केलेले नसावे. पण पूर्वी वापरलेले असावे. ४) मोठ्या भोजनसमारंभासाठी मोठ्या चुली, भट्ट्यांचा वापर झालेले नसावे. ५) धान्य, भाजी, फळे, चारा ठेवलेले स्थान नंतर रिकामे केलेले नसावे. ६) गुरांचे मोठे मोठे खुराडे, पशूचे चरण्याचे स्थान नसावे. ७) मंदिर, देवालये, स्मारक, समाधिस्थान, स्मशान, वधस्थान, कबरस्थान नसावे. ८) चौक, त्रिक, चबुतरा, मोठ्या वर्दळीचे स्थान, बागबगीचे, फिरण्याचे,
मनोरंजनाचे स्थान नसावे. ९) कोळशाच्या, खनिज पदार्थांच्या खाणी, अमराया, केतकी, बांबूचे वन,
शेती पिकलेली नसावी. १०) नदी, तलाव, किनारा, पाणपोई, दलदलीचे ठिकाण, त-हेत-हेची पूजास्थाने
नसावीत. ११) अत्यंत शांत आडोशाची प्राशुक भूमी नीट अवलोकन करून विसर्जन करावे.