________________
६) अहिंसेला अरिहंत प्रवचनाचे सार आणि शुद्ध शाश्वत धर्म सांगितले
आहे. कारण सगळ्या प्राण्यांना जगण्याची इच्छा, अस्तित्व आणि सुखाची इच्छा हा स्वभाव आहे. सगळ्यांना सुख प्रिय व दु:ख अप्रिय असते. इंद्रिय संयमावर जोर दिला आहे परंतु हेही सांगितले आहे की इंद्रियांचे विषय समोर असताना ते नाकारणे शक्य नाही. तर त्या ठिकाणी इंद्रियांच्या व्यापाराचा निरोध करण्यास सांगितला. विषय सेवनाच्या मुळाशी असलेल्या
राग, द्वेषरूपी वृत्तीचा त्याग करण्यास सांगितला आहे. सारांश :
भ. महावीरांनी मानवी मनाचा सूक्ष्म वेध घेतलेला दिसतो. अनेक बारीक गोष्टींचे चिंतन दिसते. मनुष्य एकेका कषायात कसा अडकत जातो ते वर्णिले आहे. पैसा, संपत्ती वाढली की त्याच्या आसक्तीने अनेक गोष्टी आत्मसात करण्याची धडपड करतो. साधूंनाही आपला आहार, शय्या, वस्त्र, विहारकाळात अनेकवेळा सावधानतेचा इशारा दिला आहे. येणाऱ्या प्रसंगाचे होणारे परिणाम लक्षात आणून दिले आहेत. धर्माच्या विरुद्ध वागणाऱ्याकडे लक्ष देऊ नये. उपेक्षा करा. मोहाची जागृती झाली तर अनेक उपाय सांगितले. साधूने श्रावकांच्या संपर्कात का राहू नये याचा इशारा, आध्यात्मिक साधनेत बाधा इत्यादींची जाणीव करून दिली आहे.