________________
वाटिकेत त्याला स्वास्थ्य लाभत नाही व आंतरिक भोग त्याला उपभोगूही देत नाहीत.
निसर्गतः गुणी असणाऱ्या मानवाने अवगुणांमुळे स्वत:चा -हास करून घेतला. असे हे चित्रण समाजात घडत होते, घडत आहे व पुढे घडत राहणार, हे भ. महावीरांनी आपल्या ज्ञानाने निरीक्षण करून सांगितले आहे.
आजमितीस समाजातला मानव एकटा पडला आहे, निराश, उद्विग्न झाला आहे. मानसोपचारांची गरज भासू लागली आहे. लोभाच्या ऐश्वर्याचे दारिद्रय त्याला शांती लाभू देत नाही. परंतु या तापाला सुद्धा उतारा आहे. वेळ जाण्यापूर्वीच जागे होण्याचा, विवेकी बनण्याचा ! ___सर्व समस्यांचे उत्तर फक्त पैसा नाही. ही विषारी शेती नांगरण्याचे सोडून, स्वत:पलिकडे असणाऱ्या समाधानाच्या इयत्तेत जावून बसावे. 'संसार असार आहे', हा नकारार्थी दृष्टिकोण मनातून हद्दपार होईल. सुंदर अशा या भवातूनच महापुरुषांनी आपले आत्महित साधले. तसाच पुरुषार्थ आपणही करू या व आपल्या कृतीने व प्रवृत्तीने मायावी बनवलेल्या या संसारात सगळ्यांना एक 'स्पेस' देऊन - ‘जगा आणि जगू द्या' या उक्तीप्रमाणे जीवनाचा खरा अर्थ शोधू
या.