________________
(२) ऐश्वर्यातील दारिद्र्य
सीमा सुराणा
इष्ट-अनिष्ट गुणांनी भरलेला हा संसार सर्व जीवांचे प्रवासस्थान आहे. मानव मात्र आपल्या बुद्धिचातुर्याने न्याय, नीती, सत्य, शांती या कल्याणकारी चतु:सूत्रीची कास सोडून, धर्माच्या मर्माला विसरून, अर्थ-काम-भोग या दलदलीत रुतला आहे. स्वसुखासाठी मानवतेला काळिमा फासू लागला आहे. लौकिकतेच्या हव्यासापोटी ममत्व व प्रमादाला कवटाळून, पंचमहाव्रतांची मर्यादा ओलांडून, पंचमहाभूतांचा यथेच्छ वापर मर्जीप्रमाणे करू लागला आहे. गैरमार्गाने, काळावेळाचे भान न ठेवता सर्व चित्त अर्थार्जनातच लावून, रात्रंदिवस मायेच्या जाळ्यात अडकला आहे. अशा ऐश्वर्याच्या दारिद्र्यात आत्मिक मन:शांती, समाधान हरवून भयग्रस्त झाला आहे.
माया-लोभाच्या आसक्तीने वैर वाढले. त्यामुळे वैरी निर्माण झाले. भयामुळे संरक्षणाची गरज भासू लागली. म्हणून प्रथम तो स्वत:ला बळकट करतो. नातेवाईक, मित्रपरिवार जोडतो. कामनापूर्तीसाठी होमहवन करून देवबल वाढवतो. सत्तेचा लोभी होतो व भ्रष्टाचारीयांशी संबंध जोडण्यात भूषण मानू लागतो. गोर-गरिबांना दान देऊन ऋणी बनवितो. प्रतिष्ठेसाठी, देखाव्यासाठी साधुसंतांचा आश्रय घेऊन पवित्र व धार्मिक असल्याचा आव आणतो. परंतु वरवर कितीही वाघाचे कातडे पांघरले तरी आतून मात्र शेळीप्रमाणे धास्तावलेलाच असतो. कारण केलेल्या कर्मांची फळे आपल्यालाच भोगावी लागणार, हे सत्य तो जाणून असतो. तरीही चुकीच्या क्रमाने लिहिलेली गरजांची यादी वाढतच जाते. चुकांगणित पश्चात्तापाचे रोप उगवून हळूहळू सगळे आयुष्य मात्र पश्चात्तापाची रोपवाटिका तयार होते. या
२१
—