________________
असतो. भगवद्गीतेतही क्षेत्रक्षेत्रज्ञ' अध्यायात शरीराला क्षेत्र' आणि आत्म्याला 'क्षेत्रज्ञ' म्हटले आहे. ___आचारांगात 'वीर्य' आणि 'पराक्रम' हे शब्द वारंवार उपयोजिले आहेत. हा पराक्रम अर्थातच संयमात आणि आत्मविजयात दडलेला आहे. 'महावीरा विप्परक्कमंति' अशी शब्दयोजनाही आढळून येते.
साधनेचा मार्ग कितीही खडतर असला तरी ते वीर मनाची प्रसन्नता घालवीत नाहीत. खिन्न, विमनस्क होत नाहीत. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आध्यात्मिक साधकाची वाटचाल ‘एकट्याने करावयाची मार्गक्रमणा' आहे. येथील अनुभूती प्रत्येकाची स्वतंत्र स्वतंत्र आहे. हा सामुदायिक मार्ग नाही. भ. महावीर म्हणतात 'दुरणुचरो मग्गो वीराणं अणियट्टामीणं' - अर्थात् येथे कोणी सोबती नाही आणि खरा वीर मार्गावरून पुन्हा फिरत नाही.
__ आचारांग ग्रंथातील शेवटचे अध्ययन ‘उपधानश्रुत' म्हणून प्रसिद्ध आहे. भ. महावीरांच्या उपदेशांचा संग्रह करणाऱ्या प्रभावी आचार्यांनी ते लिहिले असावे. त्यांनी सांगितलेली 'वीराची लक्षणे' त्यांच्या चरित्रातून कशी दिसतात ते सांगून अखेरीस म्हटले आहे -
सूरो संगामसीसे वा, संवुडे तत्थ से महावीरे ।
पडिसेवमाणे फरुसाइं, अचले भगवं रीइत्था ।। प्रतिक्षणी अहिंसेचे पालन करण्यात दक्ष असलेले हे तीर्थंकर गेली २६०० वर्षे महावीर' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सांगितलेली आध्यात्मिक पराक्रमाची लक्षणे त्यांनी स्वतः तंतोतंत पाळली म्हणून तर त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, 'एस वीरे पसंसिए' अर्थात् या वीराची एवढी प्रशंसा झाली !!!
२०